चंद्रपूर जिल्ह्यात हत्याच सत्र थांबता थांबेना, चंद्रपुरातील रामसेतू पुलावर घडली हत्या, मुलाला मारहाणीतून सोडवायला गेलेल्या वडिलांची हत्या ! In Chandrapur district, the killing session does not stop, killing happened on Ramsetu Bridge in Chandrapur, killing the father who went to save the child from beating

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर जिल्ह्यात हत्याच सत्र थांबता थांबेना, चंद्रपुरातील रामसेतू पुलावर घडली हत्या, मुलाला मारहाणीतून सोडवायला गेलेल्या वडिलांची हत्या ! (In Chandrapur district, the killing session does not stop, killing happened on Ramsetu Bridge in Chandrapur, killing the father who went to save the child from beating) 

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात हत्याच सत्र थांबता थांबेना नुकतीच बल्लारपूर शहरात चार युवकांनी मिळून एका तरुणाची हत्या केली असल्याची घटना घडली होती या घटनेची शाई वाळत नाही तोच चंद्रपूर शहर पुन्हा एका हत्येने हादरले चंद्रपूर शहरातील दाताळा मार्गावरील रामसेतू उडाणपूलावर घडली. किशोर नत्थुजी पिंपळकर वय 48 वर्ष, राहणार तिरवंजा, ता. भद्रावती असे मृतकाचे नाव असून ओम किशोर पिंपळकर वय 18 वर्ष, रा. तिरवंजा, ता. भद्रावती असे जखमी मुलाचे नाव आहे. दिनांक 15 जून 2023 रोजी बाबूपेठ येथील संदिप पिंपळकर यांचा लग्न सोहळा दाताला मार्गावरील शोमॅन सेलिब्रेशन या ठिकाणी होता. वरातीत डिजे च्या तालावर नाचताना ओम पिंपळकर या युवकाशी वराती मधील काही अज्ञात मुलांचा वाद झाला. लग्न सोहळा आटोपल्यावर अज्ञात युवकांनी ओम पिंपळकर याला रामसेतू उड्डाणपूलावर अडवून मारहाण करणे सुरू केले याची माहिती ओम चे वडील किशोर पिंपळकर यांना मिळताच ते भांडण सोडविण्यासाठी गेले असता अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांचे डोक्यावर लोखंडी वस्तू ने जबर मारहाण केली यात किशोर पिंपळकर खाली कोसळले दरम्यान मारेकऱ्यांनी पळ काढला. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ला करणाऱ्या 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी स्वप्नील गोपाले करीत आहेत. दरम्यान जखमी अवस्थेत किशोर पिंपळकर व ओम पिंपळकर यांच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु किशोर पिंपळकर यांची प्रकृती गंभीर असल्याने नागपूर हलविण्यात आले परंतु मार्गातच त्यांचा मृत्यू झाला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)