ह्रदयद्रावक घटना ! 5 दिवसाच्या नवजात बालकाला दिले बिब्याचे चटके, अघोरी उपायाने यवतमाळ हादरले (Heartbreaking event! A 5-day-old newborn baby was given a bottle of milk, the Aghori solution shook Yavatmal)

Vidyanshnewslive
By -
0

ह्रदयद्रावक घटना ! 5 दिवसाच्या नवजात बालकाला दिले बिब्याचे चटके, अघोरी उपायाने यवतमाळ हादरले (Heartbreaking event!  A 5-day-old newborn baby was given a bottle of milk, the Aghori solution shook Yavatmal)

यवतमाळ :- यवतमाळमध्ये हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बाळाला दवाखान्यात घेऊन जाण्याऐवजी त्याच्यावर अघोरी उपाय करण्यात आला. यामध्ये बाळ गंभीर जखमी झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यात एका नवजात बाळाच्या पोटावर बिब्बाचे चटके देऊन पोटदुखीच्या त्रासावर उपाय केल्याचा प्रकार उघडकीस आला. बाळ जन्मल्यानंतर ते पोटदुखीच्या त्रासाने रडत होते. ते पाहून आईचा जीव कासावीस झाला. जन्मदात्या आई वडिलांनी गावातील जुन्या मंडळींचे ऐकून अंधश्रद्धेचा हा अघोरी प्रकार केला. 6 जून रोजी घाटंजी तालुक्यातील पारवा पीएचसी मध्ये प्रसूती झाल्यानंतर आईवडील तिला घरी घेऊन गेले मात्र ती रडतेय म्हणून त्यांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता जेष्ठ मंडळींनी सांगितलेल्या अघोरी प्रकाराचा प्रयोग केला. पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर बिब्बा गरम करून त्याचे चटके दिले. ह्या अमानवीय प्रयोगामुळे बाळाची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टर या चिमुकलीला जीवदान देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताहेत. मन हेलावणाऱ्या हा अघोरी प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे. आजही अनेक भागांमध्ये अंधश्रद्धा बाळगली जात असल्याचं दिसत आहे. आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवण्याऐवजी असे अघोरी उपाय करुन बाळाचा जीव दाम्पत्याने धोक्यात घातला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)