बल्लारपूर शहरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा, अनेक शासकीय-निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण पार पडले, महापुरुषांची स्मारक आकर्षक रोषणाईने सजली (Maharashtra Day was celebrated with enthusiasm in Ballarpur city, flag hoisting took place in many government and semi-government offices, memorials of great men were decorated with attractive illuminations.)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर शहरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा, अनेक शासकीय-निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण पार पडले, महापुरुषांची स्मारक आकर्षक रोषणाईने सजली (Maharashtra Day was celebrated with enthusiasm in Ballarpur city, flag hoisting took place in many government and semi - government offices, memorials of great men were decorated with attractive illuminations.)


बल्लारपूर :- शहरात विविध ठिकाणी शासकीय व निमशासकीय कार्यालयात 1 मे महाराष्ट्र दिना निमित्त राष्ट्रधजाच ध्वजारोहण करून वंदन करून महाराष्ट्र गीत (गर्जा महाराष्ट्र माझा), राष्ट्र गीत सादर करून साजरा करण्यात आला. नगर परिषद येथील प्रशासक व मुख्यधिकारी विशाल वाघ यांच्या हस्ते, तर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक उमेश पाटील, शासकीय विश्राम गृह इथे सा.बा.विभागाचे अधिकारी नितीन मुत्यालवार, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारपूर यांच्या हस्ते, ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे डॉ. विजय कडस्कर यांच्या हस्ते, तसेच बल्लारपूर शहरातील विविध शाळा महाविद्यालय, व्यापारी मंडल च्या वतीनेही ध्वजारोहन करण्यात आला बल्लारपूर शहरातील मुख्य शासकीय कार्यक्रम उपविभागीय अधिकारी कार्यालयात सकाळी 8:30 वाजता मा. दीप्ती सूर्यवंशी पाटील, उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तहसीलदार चिरडे, उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, माजी वनविभाग महामंडळ चे अध्यक्ष व जेष्ठ नेते मा, चंदनसिह  चंदेल, लखनसिह चंदेल, विविध राजकीय पक्षाचे नेते, महसूल विभाग चे सर्व अधिकारी व तहसील कार्यालय चे सर्व कर्मचारी, गणमान्य नागरिकांची उपस्थित होते. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं बल्लारपूर शहरातील राष्ट्रीय स्मारक आकर्षक रोषणाई ने सजावट करण्यात आली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)