बल्लारपुरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा (Maharashtra Day Celebration at Mahatma Jyotiba Phule College in Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपुरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा (Maharashtra Day Celebration at Mahatma Jyotiba Phule College in Ballarpur)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याचा 63 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सकाळी 8:30 वाजता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. बादलशाह चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाच ध्वजारोहण करण्यात आले तदनंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्राचं राज्यगीत " गर्जा महाराष्ट्र माझा " च गायन करण्यात आले याप्रसंगी मार्गदर्शन करतांना प्रा.चव्हाण सर म्हणालेत की, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेत अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा एक इतिहास असून पिढ्यान पिढ्या येतील व जातील तरी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेतील शूरवीरांचा इतिहास हा स्मरणात राहील. यावेळी मनोगत व्यक्त करतांना प्रा. किशोर चौरे, इतिहास विभाग प्रमुख म्हणालेत की, महाराष्ट्र दिन हा कामगार दिन म्हणुन सुध्दा साजरा केला जातो कामगाराच्या अधिकाराच्या बाबतीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका महत्वाची आहे त्यांच्या प्रयत्नामुळं कामाचे तास 12 तासावरून 8 तास करण्यात आले शिवाय प्रसूती रजा, पेन्शन योजना, वेतन आयोग, कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास वारसांना नौकरी अशा अनेक योजना लागू झाल्यात खऱ्या अर्थानं 1 मे हा कामगार दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. चव्हाण सर व प्रा. कल्याणी पटवर्धन मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

          यावेळी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रा.बालमुकुंद कायरकर, प्रा.कल्याणी पटवर्धन, प्रा. शुभांगी भेंडे (शर्मा) प्रा.सविता पवार, प्रा.डॉ.विनय कवाडे, प्रा.योगेश टेकाडे, प्रा. कर्णसे सर, प्रा. रोशन साखरकर, प्रा. राजेंद्र साखरे,  प्रा. दिपक भगत, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. ललित गेडाम, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. रजत मंडल, प्रा. मोनीश माकोडे, यांच्या सह शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)