बल्लारपूरातील सातखोली परिसरात "हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना " ऑनलाईन प्रणाली द्वारे उद्घाटन सोहळा पार पडला. (Inauguration ceremony was held in Satkholi area of ​​Ballarpur through "Hinduhrdaya Samrat Balasaheb Thackeray Appa Dawakhana" online system.)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूरातील सातखोली परिसरात "हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना " ऑनलाईन प्रणाली द्वारे उद्घाटन सोहळा पार पडला. (Inauguration ceremony was held in Satkholi area of ​​Ballarpur through "Hinduhrdaya Samrat Balasaheb Thackeray Appa Dawakhana" online system.)

बल्लारपूर :-15 व्या वित्त आयोग अंतर्गत, सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत दि. 1 मे 2023 रोजी हॉटेल महाराजा समोर, सातखोली शिवाजी वार्ड बल्लारपुर येथे मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते ऑनलाईन प्रणाली द्वारे उद्घाटन सोहळा पार पडला. "हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना " चा उद्घाटन सोहळा पार पडला. बल्लारपुर शहरामधे शिवाजी वार्ड, मौलाना आझाद वार्ड, फुलसिंग नाईक वार्ड, विद्यानगर वार्ड, सरदार पटेल वार्ड, पंडीत दिनदयाल वार्ड या सहा वार्ड आरोग्य वर्धिनी केंद्र कार्यान्वीत झाले आहेत. सदर केंदाच्या सेवा त्या दुपारी 2 वाजेपासुन रात्री 10 वाजेपर्यंत मोफत दिल्या जातील जेणेकरून झोपडपट्टी भागातील नागरीक कामावरून परत आल्यानंतर आरोग्य सेवेपासुन वंचीत राहणार नाहीत. गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्यासाठी तसेच सुलभ व परवडणारी जागतीक दर्जाची सेवा प्रदान करून समाजाचा आरोग्य निर्देशांक वाढविण्यासाठी 'हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपका दवाखाना नागरी आरोग्यवर्धना केंद च्या माध्यमातून गरजू रुग्णाला सेवा देण्याचा राज्यशासनाचा मानस आहे. आपला दवाखान्याच्या". उद्घाटन प्रसंगी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, मा. डा. प्रांची नेडुलकर, 'गटविकास अधिकारी, पंचायत समिती, तालुका गटविकास मा. श्री अनिरुद्ध वाकळे तालुका आरोग्य अधिकारी मा. डॉ. साहीर मेश्राम, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय आधकारी डॉ. ज्योती डांगे विस्तार अधिकारी श्री बैलनकार असमाधान कान्टचे वैराकी अधिकारी व कर्मचारी, नागरी प्रा. आ. केंद्राचे कर्मचारी, तालुका आरोग्य अधीकारी कार्यालयाचे कर्मचारी, आशा वर्कर ई उपस्थीत होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)