वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा वनाचे रक्षण व संवर्धन करण्यात सिंहाचा वाटा, वनपरिक्षेत्र अधिका-यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला उपस्थिती. (Lion's share of forest range officers in protection and conservation of forest, attendance at state level convention of forest range officers.)
नागपूर, : वनपरिक्षेत्र अधिकारी (आर.एफ.ओ.) हा वनखात्याचा अतिशय महत्वाचा भाग आहे. यांच्यामुळेच वनांचे रक्षण व संवर्धन होण्यास मदत होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशन, महाराष्ट्र द्वारे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात बोलताना ना. मुनगंटीवार यांनी वरील वक्तव्य केले. प्रत्येक आर.एफ.ओ. कडे वनविभागाची पूर्ण जबाबदारी असते व ती जबाबदारी पूर्ण गांभीर्याने प्रत्येक आर.एफ.ओ. पार पाडत असतो याचे मला समाधान आहे, असेही बोलताना पुढे ते म्हणाले. कार्यक्रमाला फॉरेस्ट रेंजर असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष कांतेश्वर बोलके, अरूण तिखे, असोसिएशनचे सरचिटणीस निलेश गावंडे, नागपूरचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नायकडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद देशमुख, संस्थेचे माजी सरचिटणीस किशोर मिश्रीकोटकर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी आर्यनमन विजेता विशाल बोदडे यांचा ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रास्ताविक करताना असोसिएशनचे सरचिटणीस निलेश गावंडे यांनी आर.एफ.ओ. च्या विविध अधिकार व समस्यांवर सादरीकरण केले. यामध्ये मुख्यतः कर्मचारीवर्गांची कमी असल्यामुळे काम करण्यास अडचणी येतात तसेच वेतनश्रेणीवर सुध्दा त्यांनी सादरीकरणात सांगीतले. याप्रसंगी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या एका अहवालानुसार महाराष्ट्राचे हरीत क्षेत्र २५५० स्वेअर किमीने वाढले आहे. तसेच मॅनग्रोज चे क्षेत्र सुध्दा वाढले आहे. वनक्षेत्राशी संबंधित ज्या गोष्टी चांगल्या होत आहेत. त्यामध्ये तुमचा तसेच वनविभागाच्या सर्व कर्मचा-यांचा सिंहाचा वाटा आहे. गेल्या काही वर्षात विदर्भात वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यांचे संवर्धन व संरक्षण ही जबाबदारी सुध्दा तुम्ही सर्वजण उत्तम पध्दतीने करता ही आनंदाची गोष्ट आहे. वनविभागाच्या संवर्धनामध्ये तुमच्यासहीत सर्व कर्मचा-यांचा सिंहाचा वाटा आहे व महाराष्ट्र वनविभाग देशात नंबर एकवर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केले. या कार्यक्रमात आपण अनेक विषय आपण मांडलेत. यात ब-याच मागण्या सुध्दा आहे. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करेन असे आश्वस्त ना. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments