अखेर ४ महिन्यानंतर चाईल्ड लाईन व पोलिसांच्या अथक प्रयासाने बल्लारशाह रेल्वे स्थानकावर चिमुकल्या बहिण भावास सोडून गेलेल्या मुलांच्या पालकाचा अकोल्यात लागला शोध (Finally, after 4 months, thanks to the tireless efforts of Child Line and the police, the parents of the children who abandoned their little siblings at Ballarshah railway station were found in Akola)
बल्लारपूर -: चिमुकल्या बहिण आवास बल्लारशाह रेल्वे स्थानकावर सोडून गेलेल्या मुलांच्या परिवाराचा ४ महिन्याने लागला शोध जिल्ह्यातील मोठे रेल्वेस्थानक अज्ञात ठिकाणाहून या स्थानकावर आलेल्या चिमुकल्या बहीण (वय २) व भावाला (६) सोडून जन्मदाते फरार झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २५/३/२०२५ घडली होती. दोन्ही भावंडांना रेल्वे पोलिस आणि चाइल्ड लाइन पथकाने चंद्रपुरातील किलबिल संस्थेत दाखल केले. बालके सुखरूप असून, फरार जन्मदात्यांचा बल्लारपूर रेल्वे पोलिस कसून शोध घेत आहेत. रेल्वे स्थानक प्रवेश द्वाराच्या बाजूलाच असलेल्या चाइल्ड लाइन कक्षाचे पर्यवेक्षक भास्कर ठाकूर, धर्मेंद्र मेश्राम व टीम मेंबर यांनी ऑऊटरिच करताना रेल्वेस्थानकावर चिमुकल्या बहीण व भावासोबत कुणीही नसल्याचे पाहून प्रचंड धक्का बसला. त्यांनी ही बाब रेल्वे प्रशासनाला सागितली. या बालकांना ताब्यात घेऊन सर्वात आधी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. मुलांना ताप होता व ते घाबरलेले असल्याने त्यांच्या बोलण्यातून त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जीआरपीचे प्रभाकर कांबळे, उमेश भरले, किर्ती मिश्रा यांच्या सहकार्याने रेल्वे स्थानक परिसरातील अनेकांशी संवाद साधण्यात आला. मुलांविषयी माहिती जाणून घेतली. पण, काहीही पता लागला नाही. त्यामुळे बालकांचा मुस्कान नोंदणी जीआरपी ठाण्यात करण्यात आली.. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून. रेल्वे प्रबंधक दशरथ सिंह, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बानाईत, व मीनाक्षी भस्मे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर, बाल संरक्षण कक्ष अधिकारी अजय साखरकर, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अँड. क्षमा बासरकर, चाइल्ड लाइनचे समन्वयक अभिषेक मोहुर्ले यांना माहिती देऊन जिल्हा बाल कल्याण समिती, चंद्रपूर समोर सादर केले. अज्ञात बालिका वय व बालकास किलबिल प्राथमिक दत्तक संस्था, चंद्रपूर येथे तात्पुरत्या स्वरूपात येथे दाखल करण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चंद्रपूर यांनी रेल्वे चाईल्ड लाईन बल्लारशाह यांच्या मदतीने अजान बालिका हीचा SIR तसेच ICP बा.क.स. ला सादर करावा. व पालकाचा शोध लवकरात लवकर घेवून बा.क.स समोर उपस्थित करावे. असा आदेश देण्यात आला. या आदेशानुसार चिमुकली भावंडे रेल्वेस्थानकावर आदळल्यानंतर आरपीएफ कार्यालयातील निरीक्षक एस. के. पाठक सध्याचे आरपीएफ कार्यालयातील निरीक्षक संजय रॉय यांच्या उपस्थितीत सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक महिला व पुरुष यांच्यासोबत ही दोन्ही मुले दिसत असल्याची माहिती व फुटेज मिळाले.
मुलाना फुटेज दाखवल्या नंतर मुले आईचे नाव सीमा मुलीचे नाव गायत्री व भावाचे नाव चेतन असे सागितले. मुलाना वडिलाचे नाव व आडनाव आठवत नव्हते. मुले मराठी बोलत असल्याने महारष्ट्रातील असल्याचे निष्पन झाले नोटीस व माहितीच्या आधारे फोटो प्रसारित करण्यात आले. पण शोध लागला नाही. बाल कल्याण समितीच्या आदेशाने बाल कल्याण समितीच्या, चंद्रपूर अध्यक्षा अॅड. क्षमा बासरकर, सदस्य - ज्योत्सना मोहितकर, वनिता घुमे यांनी बालकाची काळजी व संरक्षण अंतर्गत विचार करून रेल्वे चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या सहकार्याने जिल्हा माहा आधार केंद्र, चंद्रपूर येथे आधार कार्ड प्रक्रिया करण्यात आली. मुलांचे आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे किलबिल या पत्यावर कार्ड मिळाले. पुन्हा मुलाचा शोध घेण्यात समस्या निर्माण झाली. बाल कल्याण समिती यांनी परत बालकांचा सामाजिक तपासणी अहवाल चाईल्ड लाईन बाल्लारपूर यांच्यामार्फत मागविण्यात आला असता पोलीस स्टेशन ला बालकांनविषयी माहिती देण्यात आली. बालकांना विश्वासात घेऊन विचारणा केली असता. एक वेळा पातळगाव, जिल्हा पुणे, व यवतमाळ येथे चाईल्ड लाईन व पोलीस यांच्या सहकार्याने शोध घेतला पण माहिती मिळाली नाही. त्या नंतर चार महिन्यानी मुलांनी पातुर सांगितले असता नेटवर शोध घेतला असता जिल्हा अकोल्या मध्ये गाव मिळाले. त्या आधारे भास्कर ठाकूर व धर्मेंद्र मेश्राम यांनी अकोला चाईल्ड लाईन यांना माहिती दिली व शोध घेण्याची विंनती केले. अकोला चाईल्ड लाईन यांनी जिल्हा पोलीस मुख्यालय व पातुर पोलीस स्टेशन अकोला यांना माहिती देताच त्यांनी शोध घेतला असता. श्री. हनमंत डोपेवाळ, पोलीस निरीक्षक यांनी तेलीपुरा पातुर येथील मुले व आई मानसिक असल्याची माहिती मिळाली. वडिलांना बाल कल्याण समिती, चंद्रपूर समोर कागज पत्रासोबत सादर करण्यात आले. मुले अकोला येथील असल्यामुळे बाल कल्याण समिती, अकोला कडे वर्ग करण्यात आले. समितीने चौकशी करून वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले या शोधा करिता २४ तास काम करणारे चाइल्ड लाइन- १०९८ चे कर्मचारी त्रिवेणी हाडके, बबिता लोहकरे, सुरेंद्र धोडरे, विजय अमर्थराज, प्रिया पिंपळशेडे, समुउदेशिका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अजय कवाडे, हेमंत कोठारे, पिंकी वासनिक, किलबिल, राहुल वाघमारे, सामाजिक कार्यकर्ता, राजपांगे, पातूर, दीक्षांत बेले यांनी मुलाच्या पालकांचा शोध घेण्यात मोलाचे सहकार्य केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या