सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने बल्लारपूर शहराला झोडपले, बल्लारपूर शहर झाले जलमय (Heavy rains lashed Ballarpur city for the second day in a row, Ballarpur city was flooded)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात आज दुपारी मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले. आज दुपारी १२ वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाच्या सरींनी शहरात हळूहळू पाणी साचण्यास सुरुवात केली. मात्र, दुपारी ३ वाजताच्या सुमारास आलेल्या गडगडाटासह पावसामुळे रस्ते, गल्ली-बोळ पाण्याखाली गेले. शहरातील नाल्यांची योग्यवेळी सफाई न केल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आणि त्यामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले. विशेष म्हणजे नगर परिषद समोरील चर्च पासून ग्रामीण रुग्णालयापर्यंतचा मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तसेच जुना बसस्टँड परिसर व सब्जी मंडीकडे जाणारा मार्गही पाण्याने भरून गेला होता. वस्ती विभागातील गोल पूल ही काही काळाकरिता जलमय झाला होता. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दरवर्षी ही परिस्थिती उद्भवत असून, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मान्सूनपूर्व नाले सफाई कडे प्रशासनाने वेळीच लक्ष दिल्यास भविष्यात अशा संकटापासून मुक्ती मिळू शकते सोबतच आपल्या आसपासच्या परिसर स्वच्छ राखणे ही प्रत्येक जागृत नागरिकांची जबाबदारी आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या