विरूर पोलिसांच्या कार्याला सलाम, पाऊसामुळे 3 ते 4 तासापासून बसमध्ये अडकलेल्या 60 शालेय विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका (Salute to the work of Virur Police, 60 school students who were stuck in a bus for 3 to 4 hours due to rain were safely rescued)
राजुरा :- काल वरुर–विरुर मार्गावरील नाले तुडुंब भरून वाहत होते. टेंबुरवाही, चिचबोडी, शिर्सी येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक वाहने अडकली होती. विशेषतः 60 शालेय विद्यार्थी बसमध्ये तीन तास अडकले होते. अशावेळी विरुर पोलिसांनी धाडसी भूमिका घेत, आपल्या पोलिस जीपमधून पाण्यात जाऊन विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी, बिस्किटे दिली. रात्र असतानाही, पाण्यातून दोन वेळा फेरफटका मारत परिस्थितीची पाहणी केली. स्वतः ठाणेदार वाकडे साहेब यांनी जीप समोर लावून दोन बसेस बाहेर काढल्या. शेवटी, रात्रो 12 वाजेपर्यंत पोलिसांनी प्रत्येक विद्यार्थ्याला सुखरूप घरी पोहोचवले. यावेळी PSI जाधव साहेब, पोलिस कर्मचारी राहुल वैद्य, विजय मुंडे, हर्षल लांडे आणि इतर कर्तव्यदक्ष अधिकारी उपस्थित होते. सलाम आहे अशा जबाबदार, धाडसी पोलिस टीमला!
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या