बल्लारपुरात आणखी एका तरुणाची गळफास घेवून आत्महत्या, दुपारी 12 वाजताच्या दरम्यानची घटना असल्याचा अंदाज (Another youth committed suicide by hanging himself in Ballarpur, believed to be an incident between 12 noon.)
बल्लारपूर - बल्लारपूर शहर आज 2 तरुणाच्या आत्महत्यानी सुन्न झालंय आज सकाळी 10:00 वाजताच्या सुमारास संपवेल क्वार्टर, गणपती घाट परिसरात वेकोलि कर्मचारी असलेले प्रशांत मनोहर पिंपळशेंडे वय - 30 वर्षे यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची माहीती कळली असता पोलीस विभागाने आपली कार्यवाही पुर्ण करीत नाही तोच बल्लारपूर शहरातील स्थानिक मौलाना आझाद वॉर्ड परिसरात निवासी असलेले अर्जुन रामलखन निषाद वय - 26 वर्षे यांनी आपले राहते घरी कुणीच नसल्याची संधी साधत दुपारी 12:00 वाजताच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उजेडास आली. विशेष म्हणजे सदर युवक हा आजच सकाळी 11:00 वाजताच्या सुमारास परिसरातील नागरिकांना आपल्या घरासमोर फिरताना नागरिकांना दिसून आला होता. या संदर्भात सूत्राद्वारे मिळालेल्या माहीती नुसार सदर युवकाने बेरोजगारीने आर्थिक तंगीमुळे आत्महत्या केली असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे मात्र पोलीस तपासात सत्य काय ते समोर येईलच सदर घटनेची माहीती पोलिसांना कळताच पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाली व तरुणाच्या गळफास सैल करून तरुणावर काही उपचार होऊ शकेल का या उद्देशाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र तपासणी अंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर युवकाला मृत घोषित केले. या संबंधी पोलीस तपास सुरु असून उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येइल मात्र बल्लारपूर शहरात आज 2 तरुण युवकाच्या गळफास घेवून आत्महत्यांच्या घटना घडल्यामुळे जनमाणसात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments