मूल पोलिसांची कारवाई, खंडणी वसूल करणाऱ्या तोतया पोलिसांच्या टोळीला मुद्देमालासह अटक (Action taken by the Mul police, gang of impersonators collecting extortion arrested with valuables)

Vidyanshnewslive
By -
0
मूल पोलिसांची कारवाई, खंडणी वसूल करणाऱ्या तोतया पोलिसांच्या टोळीला मुद्देमालासह अटक (Action taken by the Mul police, gang of impersonators collecting extortion arrested with valuables)


मूल :- भरारी पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी वसूल करणाऱ्या तोतया पोलिसांच्या टोळीला मूल पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींमध्ये एक महिलासह चार आरोपींचा समावेश असून १३ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बादल दुर्गाप्रसाद दुबे (३६), संगीता बादल दुबे (२७), रा. रेंगेपार, ता. साकोली, जि. भंडारा, अजय विजय उईके (३१) , रा. गजानन मंदिर रोड, शितला मातामंदिरच्या मागे चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अन्य एक आरोपी देवेंद्र चरणदास सोनवणे (३०), रा. निलज, ता. साकोली, जि. भंडारा, ह.मु. भिवापूर वॉर्ड चंद्रपूर हा फरार आहे. आरोपींनी ३ जुलै रोजी मूल तालुक्यातील चिरोली येथील सुरेश लक्ष्मण गणमेनवार यांच्या घरी एमएच ३४ सीजी ५८२४ क्रमांकाच्या कारने जाऊन चंद्रपूरचे पोलीस भरारी पथक असल्याची बतावणी करून विनापरवाना सुरू असलेल्या दारूविक्रीवर कार्यवाही करण्याची धमकी दिली. यावेळी कारवाई न करण्यास १५ हजार रुपयांची मागणी करून तडजोडअंती १० हजारांची खंडणी मागितली. तसेच डोंगरगाव येथील एजाज शेख इब्राहिम शेख यांच्या अंडा-आमलेट दुकानात जाऊन दुकानात दारू पिणारे व्यक्ती आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांना १० हजारांची खंडणी मागितली. दरम्यान, तोतया पोलिसांची टोळी असल्याचे निदर्शनास येताच सुरेश गणमेनवार व शेख इब्राहिम शेख यांनी १३ जुलैला मूल पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी अपराध क्रमांक २५३/२०२५ कलम ३०८ (२), २०४, ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा नोंदविला. सदर गुन्ह्याच्या तपासात मूल पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून बादल दुबे, संगीता दुबे, अजय उईके यांना अटक केली. तर देवेंद्र सोनवणे हा फरार आहे. आरोपी कडून एक कार, तीन मोबाईल व नगद १५ हजार रुपये असे एकूण १३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विजय राठोड यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी, पोहवा जमीर खान पठाण, पोहवा भोजराज मुंडरे, नापोअं चिमाजी देवकते, पोअं नरेश कोडापे, पोअं शंकर बोरसरे, पोअं संदीप चुधरी सह आदींनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)