बल्लारपूर शहरात धाडशी चोरी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास, पोलिसात तक्रार दाखल (Bold theft in Ballarpur city, valuables worth lakhs of rupees stolen, complaint filed with police)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर शहरात धाडशी चोरी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास, पोलिसात तक्रार दाखल (Bold theft in Ballarpur city, valuables worth lakhs of rupees stolen, complaint filed with police)

बल्लारपूर :- शहरात चोरट्यांनी धाडसी चोरी करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ही घटना २३ जुलै ते २४ जुलै चा मध्यरात्री बालाजी वॉर्ड येथे घडली असून, चोरट्यांनी घराचा कुलूप तोडून सोन्याचे दागिने, लॅपटॉप व नगद रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बालाजी वॉर्ड येथील संतोष सचदेव हे पत्नी सोबत आपल्या नातेवाइकाचा अंत्यसंस्कार करीता अकोला येथ गेले होते. घरी त्यांची मुलगी कु श्वेता सचदेव घरी एकटीच होती. ती २३ जुलै रोजी दिवसभर घरी थांबून रात्री १० वाजता घराला कुलूप लावून शेजाऱ्याच्या घरी जेवण व झोपायला गेली होती. २४ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास कु श्वेता घरी आली असता तिला मुख्य दरवाजाचे कोंडी तुटून दिसले. चोरांनी घरात घुसून ६० ग्रॅम सोन्याचे नेकलेस, ५० ग्रॅम सोन्याचे बिस्कीट, लॅपटॉप, नगद ५३ हजार ५०० रुपये असे लाखों रुपयांचे मुद्देमाल लंपास केल्याचे तिचा लक्षात आले. श्वेता संतोष सचदेव हिने बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरुध्द कलम ३०५(अ), ३३१(४) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शब्बीर पठाण करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)