'सिटीपीएस' मध्ये 15 ते 20 फुटाच्या उंचीवरुन पडून दोन कामगार जखमी, दोन्ही कामगाराच्या पायाला दुखापत झाल्याचं वृत्त (Two workers injured in CTPS from a height of 15 to 20 feet, both workers injured in leg)
चंद्रपूर :- चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील संयंत्राच्या फॅन दुरुस्तीचे काम करीत असताना जवळपास 15 ते 20 फुटांवरून अधिकारी व कर्मचारी खाली पडल्याने ते जखमी झालेत. सदर घटना काल 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. सिटीपीएसमध्ये गेल्या 15 दिवसात दुसर्यांदा झालेल्या या अपघातामुळे सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात 500 मेगॅवॉट संयंत्राच्या फॅन दुरुस्तीचे काम सुरू होते. हे काम व्यवस्थित झाले अथवा नाही हे तपासण्यासाठी ट्रायल ग्रिप लावण्यात आले. त्याच वेळी दुरुस्तीचे काम करीत असलेले कनिष्ठ अभियंता जांभूळकर व तंत्रज्ञ दुष्यंत आपेवार यांना 'फ्लॅश ओव्हर' झाल्याने धक्का बसला. त्यामुळे ते जवळपास 15 ते 20 फुटांवरून खाली पडले. दोन्ही कर्मचार्यांच्या पायाला दुखापत झाल्याने उपस्थित कर्मचार्यांनी त्यांना तत्काळ वीज केंद्राच्या रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून त्यांना चंद्रपूर येथील मुसळे यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती आहे. दोन्ही कर्मचार्यांच्या पायावर मोठ्या प्रमाणात सुज आली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments