अबब ! बल्लारपुरात चक्क सोनाराच्या घरीच सोन्यावर डल्ला, सोन्याचे दागिने चकचकित करून देण्याच्या बहाण्याने चोरटे दागिने घेवून पसार, पोलिस तपास सुरु (Abba ! In Ballarpur, gold was stolen from a goldsmith's house, stolen jewelery was stolen on the pretext of polishing it, police started investigation.)
बल्लारपूर : दोन अज्ञात आरोपींनी सोनाराच्या घरी जाऊन घरी असलेल्या सासू-सुनेला सोने चकचकीत करून देतो असे आमिष दाखवून व महिला आत गेल्याची संधी साधत सोन्याची एक पोत व गोफ घेऊन दुचाकीने पसार झाले. या घटनेची तक्रार फिर्यादी ममता गोपाल कडेल या महिलेने पोलिस स्टेशनला गुरुवारी सायंकाळी दिली. या विषयीच्या अधिक माहितीनुसार गुरुवारी दुपारी गांधी वॉर्डातील ममता कडेल आपल्या सासूसह घरात बसून असताना तेथे दोन तरुण आले व त्यांनी आम्ही सोन्याचे साहित्य चकचकीत करून देतो, असे सांगितले. त्यापूर्वी त्यांनी प्रयोगात्मक स्वरूपात काही वस्तू चकचकीत करून दाखवल्या. त्या लोभात येऊन त्या महिलेने घरातून दोन लाख रुपये किमतीचे एक पोत व सोन्याचा गोफ त्यांना आणून दिला. तेव्हा त्यांनी पाणी गरम करून आणण्यास सांगितले व संधी साधून तेथून पसार झाले. याविषयी सदर महिलेला माहीती होताच त्यांनी आरडाओरडा केला मात्र आपण फसले गेल्याची माहीती कळताच त्यांनी लगेच या घटनेची पोलिस तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे पोलिस विभागाने भद्रावती व बल्लारपूर शहर व परिसरात सोन्याचे दागिने साफ़ करून देण्याच्या बहाण्याने फसवणुकीच्या घटना घडत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments