चिचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्रात चौकीदाराने मारहाण केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Vidyanshnewslive
By -
0

चिचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्रात चौकीदाराने मारहाण केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू 


चंद्रपूर:-चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात चौकीदाराने मारहाण केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात आज पाच मे रोजी मृत्यू झाला. प्रेम केशव तावाडे असे मृत तरुणाचे नाव असून, तो 35 वर्षांचा होता. गोंडपिपरी तालुक्यातील कुडेनांदगाव येथील रहिवासी असलेला प्रेम तावाडे हा पत्नीला भेटण्यासाठी 28 एप्रिलला चीचपल्ली येथे आला होता. त्याची पत्नी वनविकास महामंडळात चौकीदार म्हणून कामाला आहे. मात्र, तिथे असलेल्या मनोहर दुर्योधन या चौकीदाराने प्रेम यास बांबूने मारहाण केली. यात प्रेम हा जबर जखमी झाला. त्याला चंद्रपूर येथील डॉ. पोद्दार यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना आज गुरुवारी मृत्यू झाला. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मनोहर दुर्योधन यांना अटक करण्यात आली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)