बल्लारपुर येथील दादाभाई नौरोजी वॉर्डात 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार, पोलिसांनी आरोपीला पॉक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपुर येथील दादाभाई नौरोजी वॉर्डात 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार, पोलिसांनी आरोपीला पॉक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल 

बल्लारपुर :- बल्लारपुर शहरातील दादाभाई नौरोजी वॉर्ड परिसरात एका नराधमाने 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असुन या संदर्भात पोलिसांनी एका आरोपीस पॉक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भातील अधिक माहितीनुसार सदर आरोपीने शेजारी राहणाऱ्या  त्या चिमुकलीस पान टपरी वरून खर्रा आणण्याचे निमित्त सांगून सदर बालिकेला तोंडावर रुमाल दाबून अत्याचार प्रकरणात पोलिसांनी सदर आरोपीस अटक केली आहे.सदर घटना  3 मे ला घडली त्यावेळी चिमुकलीचे आई-वडील घरी नव्हते मात्र सायंकाळी आई-वडील घरी येताच चिमुकलीने घडलेला प्रकार पालकांना सांगताच पालकांनी बल्लारपुर पोलिस स्टेशन गाठत या घटनेची तक्रार दाखल केली या माहितीच्या आधारे बल्लारपुर पोलिसांनी या प्रकरणात अटक कऱण्यात आलेल्या तरुणाचे नाव ऍंथोनी फ्रान्सवा वय-35 वर्षे रा. दादाभाई नौरोजी वॉर्ड बल्लारपुर असुन यांचे विरुध्द बल्लारपूर पोलिस स्टेशन मध्ये भादवी कलम 376, ए,बी 4 पॉक्सो 20/2 नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास उमेश पाटील पोलिस निरीक्षक बल्लारपुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी नेहा सोलंकी करीत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)