माणसाला माणूस बनविण्याचं काम पुस्तके करतात - मा. संजय राईचंवार, तहसीलदार बल्लारपूर बल्लारपूरात महात्मा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने ३ दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन

Vidyanshnewslive
By -
0

माणसाला माणूस बनविण्याचं काम पुस्तके करतात - मा. संजय राईचंवार, तहसीलदार बल्लारपूर

बल्लारपूरात महात्मा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने ३ दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन

बल्लारपूर :- पुरोगामी महाराष्ट्र ज्या सामाजिक सुधारकामुळे ओळखला जातो त्या फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांशी अनुसरून व त्या महामानवाच्या संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन बल्लारपूर शहरातील विद्यानगर वार्डातील भिमा-कोरेगाव विजयस्तभं, जयभीम चौक परिसरात करण्यात आले आहे या उत्सवाच्या अध्यक्ष म्हणून नागपुरातील प्रसिध्द साहित्यिक प्रा.संजय जीवने, प्रमुख पाहुणे म्हणून मा.संजय राईचंवार, तहसीलदार साहेब, बल्लारपूर, रमीज मुलाणी, सहायक पोलिस निरीक्षक बल्लारपूर, प्रसिध्द आंबेडकरी कवी मा. भाऊराव लोखंडे, रतनसिंग(नाना) बुंदेल, व समितीचे अध्यक्ष विनोद फुलझेले ई ची विचारपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या उदघाटनापूर्वी थोर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करण्यात आले. यावेळी बोलतांना मा.संजय राईचंवार म्हणाले की माणसाला माणूस बनविण्याचं काम केवळ पुस्तकच करतात जग तंत्रज्ञानाच्या बाबतीत कितीही पुढं गेलं असलं तरी पुस्तकाशिवाय माणसाला तरणोपाय नाही शिवाय त्यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव कथन करतांना म्हंटले की, पुस्तकांच्या वाचनाच्या सवयीमुळे ते त्यांच्या गावातील पहिले शासकीय अधिकारी म्हणून रुजू झाले ज्या काळात माणसाला माणूस म्हणून जगण्यात व्यवस्थेने अनेक अडचणी निर्माण केल्यात त्या काळात बाबासाहेबांनी शिक्षण घेऊन आपल्या समाजाला एक नवी दिशा देण्याचे प्रयत्न केला. तसेच रमीज मुलाणी सपोनि बल्लारपूर यावेळी विचार मांडताना म्हणाले की बाबासाहेबांनी केवळ सामाजिक सुधारणाच नाही केल्या तर कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी सुध्दा महत्वाचं कार्य केले ज्यामुळं आमचा पोलीस विभाग सुध्दा त्यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यस्था कायम ठेवण्यात काम करतो आपण स्वतः केवळ राहण्यासाठी घर बांधतो मात्र जगात एकच असे महापुरुष होऊन गेलेत ज्यांनी केवळ पुस्तकासाठी मुंबईत प्रशस्त असे घर बांधले. प्रसिध्द आंबेडकरी साहित्यिक भाऊराव लोखंडे यांनी  कविता स्वरूपात मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी बाबासाहेबांनी नागपूरच्या ऐतिहासिक धम्मदीक्षेचा साक्षीदार असल्याची व स्वतः बाबासाहेबांच्या हस्ते दीक्षा ग्रहण करून दिल्याची आठवण करून देतांना " मी पाहिलेले बाबासाहेब " कविता रुपात सादर केले. या कार्यक्रमाच सूत्रसंचालन प्रा.विनय कवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.राजेश ब्राम्हणे यांनी केले. या उदघाटन पर कार्यक्रमानंतर दुपारी १ ते सायंकाळी ७ पर्यंत कव्वाली चा बहारदार कार्यक्रम साजरा होणार आहे तर रात्री ८:०० वाजता " मी रमाई आंबेडकर बोलतेय " साची संजय जीवने नागपूर सादर करणार आहेत.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)