बल्लारपुरातील ह्रदयदायक घटना, घरी वडिलांचं प्रेत असतांना मुलगा गेला परीक्षा द्यायला, स्वतः च्या कृती तुन दिला मोठा संदेश !
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील संतोषी माता वार्ड, कारवा रोड येथील रहिवासी रुपलाल लोखंडे वय 48 वर्ष यांचे काल 26 एप्रिल सायंकाळच्या सुमारास दीर्घ आजाराने मृत्यू झाले. ते गंगासागर नाईक आश्रम शाळा, आंबेधानोरा येथे शिक्षक म्हणून कार्यरीत होते. त्यांना दोन मुले, पत्नी आहेत. आज त्यांचा मुलाचं अनुरागचा 10 च्या सीबीएसई बोर्ड ची परीक्षा होती. तो बल्लारपूर शहरातील दिलासाग्राम कॉन्व्हेंट मध्ये शिकत आहे. ऐन परीक्षेच्या दिवशी स्वतःच्या वडिलांचं प्रेत घरी होते. सगळे पाहूणे घरी आले होते, रडारड सुरू होते. इकडे प्रेत व दुसरी कळे मुलाची परीक्षा होती. घरच्यांनी व मोठे वडील प्रा. मारोती लोखंडे यांनी ठाम विचार करून मुलाला परीक्षा द्यायला पाठविले. असे करतांना घरच्यांनी अनुरागला सांगितले की, आपल्या समाजाला महामानवाच्या विचारांचा वारसा लाभला असुन अनेक कष्टातुन बाबासाहेबानी शिक्षण घेवून आपल्याला स्वाभिमानाने जिवन जगण्याचं शिकविले याची जाणीव त्या मुलाला करून दिली यामुळे मुलगा अनुरागने आज 27 एप्रिल ला आपल्या शाळेत जाऊन 10 वीची सिबीएससी परीक्षा दिली व परीक्षा देऊन आल्यावर घरात असलेल्या वडिलांच्या मृतदेहावर सर्व धार्मिक सोपस्कार पार पाडून अंतिम यात्रा काढण्यात आली. एकूणच घरातील परिस्थिती कशीही असो मात्र कोणत्याही विद्यार्थ्याने शिक्षणात खंड पडु देऊ नये जणू असा संदेशच अनुराग ने आपल्या कृती तुन दिला आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या