Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बौद्ध भिक्षुवर समाज कंटकांचा हल्ला, पोलीसांनी अवघ्या काही तासांतच एकाला केली अटक, बल्लारपुर कलामंदिर परिसरातील घटना

बौद्ध भिक्षुवर समाज कंटकांचा हल्ला, पोलीसांनी अवघ्या काही तासांतच एकाला केली अटक, बल्लारपुर कलामंदिर परिसरातील घटना 

बल्लारपूर :- बल्लारपूर येथील कला मंदिर परिसरात एका बौद्ध भिक्षूला दोन युवकांनी मारहाण केली. या विषयीच्या अधिक माहितीनुसार बौद्ध भिक्षु सत्यपाल आपले धम्म कार्य पुर्ण करून आपल्या निवासाकडे जात असतांना काल मंगळवार सायंकाळी 7:00 वाजताच्या दरम्यान घटना घडली बौद्ध भिक्षू हे बुद्ध धर्माचे प्रचारक आणि धम्माचे प्रसारक आहेत. सत्य,शांती,अहिंसा,बुद्धाच्या या तत्त्वावर आपले जीवन व्यतीत करतात. परंतु काही समाजकंटकांनी बल्लारपूर स्थित एका बौद्ध भिक्षूला शिवीगाळ करून अपमानास्पद वक्तव्य केले. त्यांच्या अंगावरचे चिवर फाडून त्यांना मारहाण करण्यात आली ही अनुचित घटना वाऱ्यासारखी पसरताच समाजातील शेकडो नागरिक बल्लारपूर पोलीस ठाणे येथे जमा झाले आणि भिक्षूंच्या तक्रारीवरून कन्नमवार वार्ड येथील टीपू सिंग वय 25 वर्ष तसेच सोनू यादव अशा दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस स्टेशन समोर भावनिक तसेच धार्मिक भावना दुखावलेला समाज न्यायाच्या अपेक्षेत गर्दी करून वाट पाहत होता. पोलिसांनी घटना घडल्या पासून  एका तासात आरोपींना अटक केली.  बौद्ध भिक्षूला अश्लील शिवीगाळ, अपमानास्पद वक्तव्य आणि मारहाण केल्या प्रकरणी भादवी 341, 294, 323, तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट 3ARS, 32 ,5 (अ) अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. उमेश पाटील करीत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज),  मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या