धक्कादायक ! 50 हजार रु ची लाच प्रकरणी अटकेत असलेल्या पोलिस शिपायाने राजुरा तलावात उडी घेवून केला आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह ? अटकेत असलेला आरोपी निसटला कसा ?

Vidyanshnewslive
By -
0

धक्कादायक ! 50 हजार रु ची लाच प्रकरणी अटकेत असलेल्या पोलिस शिपायाने राजुरा तलावात उडी घेवून केला आत्महत्येचा प्रयत्न 

पोलिसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह ? अटकेत असलेला  आरोपी निसटला कसा ?

राजुरा :- राजुरा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील लाच प्रकरणातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एक आरोपी राजेश त्रिलोकवार याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या ताब्यातून निसटुन रात्री 10:10 मिनिटांनी नगर पालिकेच्या जवळच्या राजुरा तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर आरोपी पोलिसाने लघवीच्या बहाण्याने पळ काढून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता सदर आरोपी पोलिसाला वाचविण्यात यश आले. घटनास्थळी अनेक पोलीस उपस्थित असुनही त्यांना त्रिलोकवार ह्यांना बाहेर काढणे जमले नाही मात्र शहरातील युवक मंगल चव्हाण ह्याने हिंमत दाखवुन तलावात उडी घेतली व त्रिलोकवार ह्यांना तलावातून बाहेर काढण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या ताब्यात असलेला आरोपी पोलीस ठाण्यातून पळून आत्महत्या करायला गेलाच कसा हा प्रश्न असुन ताब्यातील व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी ठरल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)