राजुरा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात 2 पोलीसाना 50 हजार रु ची लाच घेतांना रंगेहात अटक, उपविभागीय पोलिस अधिकारी चौकशीच्या घेऱ्यात ?

Vidyanshnewslive
By -
0

राजुरा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात 2 पोलीसाना 50 हजार रु ची लाच घेतांना रंगेहात अटक, उपविभागीय पोलिस अधिकारी चौकशीच्या घेऱ्यात ?

राजुरा :- उपविभागीय पोलिस अधिकारी राजुरा कार्यालयातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना राजेश त्रिलोकवार वय 52, सुधांशु मडावी, वय 40 यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने 50 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली असुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतलेल्या झडतीमधे एका दुचाकी वाहनातून 2,60,000 रुपयांची रोकड सुद्धा हस्तगत करण्यात आल्याची चर्चा आहे. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षक व रायटरला ताब्यात घेतल्याची चर्चा असुन सदर यशस्वी कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपुर येथील चमूने उपविभागीय अधिकारी चाफले ह्यांच्या नेतृत्वात सापळा रचून रंगेहाथ अटक केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले असुन वृत्त्त लिहीत पर्यंत विभागाची कारवाई सुरू आहे. विषेश म्हणजे सदर कारवाई आज दूपारी 3:00 वाजताच्या दरम्यान कऱण्यात आली राजुरा पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदर कारवाई उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बाहेर असलेल्या चहा टपरी वर कऱण्यात आली ही कारवाई नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप पोलिस अधिक्षक श्रीमती चाफले आणि कर्मचारी करीत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज),  मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)