मूल मार्गावर शस्त्राचा धाक दाखवून जवळपास १९ लाख रु लुटल्याची धक्कादायक घटना : गुन्हे शाखा व मूल पोलिसांचा तपास सुरू

Vidyanshnewslive
By -
0

मूल मार्गावर शस्त्राचा धाक दाखवून जवळपास १९ लाख रु लुटल्याची धक्कादायक घटना : गुन्हे शाखा व मूल पोलिसांचा तपास सुरू

मूल :- मूल येथील गोयल बंधूंच्या मालकीचा महालक्ष्मी सिमेंट आणि हार्डवेअर कम्पनी द्वारा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात व्यवसाय केला जातो व्यवसायाद्वारे साहित्याची केलेल्या विक्रीची उधारीचे पैसे तीन नौकराच्या माध्यमातून संबंधिताकडून केली जाते व अशीच उधारीचे  लाखो रुपयांची वसुली करून दुचाकीने मूल ला परत येत असताना मूल जवळील जानाळा दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीला धडक देऊन खाली पाडले व शस्त्राचा धाक दाखवून लाखो रुपयांची रक्कम लंपास केली असल्याची घटना काल रात्री ८:४५ ते ९:०० वाजताच्या दरम्यान मूल जवळ घडली. याविषयी च्या अधिक माहितीनुसार मूल येथील अक्षय गोवर्धन व हळदी येथील दिनेश चलाख हे आपल्या हिरो स्पेलंडर क्र एम एच 34 बी वाय 7221 ने आपली उधारी वसूल करण्याकरिता पोंभूरणा, गडचांदूर, राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, चिंचपल्ली वरून मूल ला परत येत असतांना त्यांचे जवळ असलेले १८,९३,२५० रु ची रक्कम मूल कडे परत येत असताना डोनी फाट्याजवळ वळण मार्गावर मागून येणाऱ्या एका मोपेड वाहनाने यांच्या दुचाकीला धडक दिली व शस्त्राचा धाक दाखवून त्यांचेजवळ असलेली रक्कम घेऊन चंद्रपूर मार्गाने पसार झाले. या घटनेनंतर अक्षय गोवर्धन यांनी मागून येणाऱ्या वाहनांची मदत घेऊन मूल गाठलं व सदर घटनेची माहिती दुकानाचे मालक दिनेश गोयल यांना दिली या प्रकरणाची माहिती होताच मालकांनी सदर घटनेची माहिती लागलीच पोलीस स्टेशन मूल ला दिली त्याच वेळेस मूलचे पोलीस निरीक्षक लगेच घटनास्थळी दाखल झाले शिवाय या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी वर्गासह जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशनला देण्यात आली व नाकेबंदी ही करण्यात आली यादरम्यान पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे ई नी घटनास्थळाला भेट दिली  या घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब खाडे व मूल पोलीस स्टेशनचे पोऊनी पुरुषोत्तम राठोड करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)