चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरीपुत्र व पुत्रीच अन्नत्याग आंदोलन हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ! १९ मार्च १९८६ ला यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हान येथील साहेबराव करपे यांनी कुटुंबियांसह सामूहिक आत्महत्या केली असल्याची माहिती

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरीपुत्र व पुत्रीच अन्नत्याग आंदोलन हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन !

१९ मार्च १९८६ ला यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हान येथील साहेबराव करपे यांनी कुटुंबियांसह सामूहिक आत्महत्या केली असल्याची माहिती 

चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शेतकरी  आत्महत्येच्या ३४ व्या स्मुतीदिनानिमित्य चंद्रपूर जिल्ह्यातील किसानपुत्र आणि पुत्री अन्नत्याग आंदोलन करून शेतकऱ्याप्रति सहवेदना व्यक्त करणार आहेत. या आंदोलनाचा समारोप १९ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता होईल. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी १९ मार्च १९८६ ला सामुहिक आत्महत्या केली. राज्यातील ही पहिली अधिकृत शेतकरी आत्महत्या. त्यानंतर आजतागायत लाखो शेतकऱ्यानी गळफास लावून घेतला. शेतकèयाच्या आत्महत्या वाढत आहेत. धोरणकर्ते शेतकऱ्याचे ऐकत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्याच्या पाठीशी शेतकरीपुत्र आणि पुत्रींना उभे रहावे लागणार आहे. त्याअनुषंगाने अन्नत्याग आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी तुम्ही कामावर असाल. तिथे दिवसभर उपवास करून आंदोलनात सहभागी होऊ शकता. या आंदोलनाची सांगता १९ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता इंस्पायर इंस्टीट्युट आकाशवानी रोड येथे करण्यात येईल. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आदरांजली आणि त्याच्याप्रति सहवेदना व्यक्त केल्या जाईल. गतवर्षी राज्यभरात अन्नत्याग आंदोलन झाले होते. वेगवेगळ्या क्षेत्रांतील किसानपुत्र आणि पुत्री या अन्नत्याग आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्या. यावर्षीही राज्यभरात अन्नत्याग आंदोलन होणार आहे. यात सर्वपक्षीय नेते, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभागी व्हावे आणि शेतकऱ्याप्रति संवेदना व्यक्त करावी, असे आवाहन किसानपुत्र फाउंडेशनने केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)