बल्लारपूर नगरपरिषदेच्या वसंत वाचनालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी - आम आदमी पार्टी, बल्लारपूर

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर नगरपरिषदेच्या वसंत वाचनालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी - आम आदमी पार्टी, बल्लारपूर 

बल्लारपूर :- शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपाध्यक्ष अफजल अली यांच्या नेतृत्वात आज १६ मार्च रोजी नगरपरिषद बल्लारपूरचे उप मुख्य अधिकारी काटकर साहेब यांना निवेदन सादर केले, नगरपरिषद बल्लारपूर द्वारे एक कोटी रुपये खर्चून बांधलेला वसंत वाचन कक्ष धूळ खात आहे, वाचन कक्षात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे शुद्ध पाणीही उपलब्ध नाही, संपूर्ण वाचन कक्ष आणि पुस्तक धूळ खात आहे आणि जाळी लागले आहेत,  विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाचनालयात शांतता व शिस्त ठेवण्यासाठी आणि देखरेख ठेवण्यासाठी अधिकृत व्यक्ती उपलब्ध नाही, MPSC आणि UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी न्यूज पेपर आणि मॅग्जीन्स ची खूप गरज आहे, संगणक हॉलसुद्धा सुरू झालेला नाही व सुविधाही उपलब्ध नाही, प्रसाधन केंद्रात स्वछताही होत नाही आणि वाचन कक्षात येणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळी १०:१५ ते ०६:०० वाजेपर्यंतची वेळ सुद्धा खूप कमी होत आहे, आम्हाला आशा आहे की आपण लवकरच येथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याल.

वसंत वाचणालयासाठी आवश्यक मांगणी :-

१) नेहमी स्वच्छता राखण्याचे नियोजन करा.

२) शांतता राखण्यास चे फलक लावा आणि तिथे अधिकृत व्यक्तीची नियुक्ती करा.

 ३) लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची सोय करा.

४) वाचनालयाची वेळ सकाळी ६.०० ते रात्री ९.०० असावी.

५) सर्व न्यूज पेपर आणि आवश्यक पत्रिका (Magazine) प्रदान करा.

६) मुलांना टिफिन करण्यासाठी स्वच्छ खोली तयार करा.

७) वाय-फाय सुविधा द्या.

८) संगणक हॉल चालू करा.

यावेळी शहर उपाध्यक्ष अफजल अली, कोषाध्यक्ष आसिफ शेख, महिला शहराध्यक्ष अल्का वेले, उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, सचिव ज्योती बाबारे, संघठण मंत्री सरिता गुजर, सुदाकर गेडाम, सागर कांबळे, हेमराज गेडाम, केशकर, रुपेश, रवि प्रजापती, शुभम, राकेश निषाद, अनुज बुरचुंडे, अक्षय माहेशकर, निखिल दुधे, आदित्यज्ञान, रामेश्वर हाके, सौरभ तेजाने, निखिल पोहणे, गणेश आणि इत्यादी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)