बल्लारपूर :- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित गुरू नानक विज्ञान महाविद्यालय, बल्लारपूर येथील रसायनशास्त्र विभाग व केमेस्ट्री टीचर्स असोसिएशन, इंडिया (ACT) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ व ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद यशस्वीरीत्या पार पडली. “इनोव्हेशन इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल सायन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट - २०२६” या विषयावर ही परिषद बल्लारपूर येथील नाट्यगृह, फंक्शन हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी गुरू नानक सेवा समिती, विरूर–बल्लारपूरचे सन्माननीय अध्यक्ष सरदार नागिंदर सोनी हे उद्घाटक म्हणून आभासी पद्धतीने उपस्थित होते. परिषदेसाठी की-नोट स्पीकर म्हणून प्रा. वासुदेव गुरनुले (उपाध्यक्ष, ACT) यांचे मार्गदर्शन लाभले. परिषदेच्या पहिल्या तांत्रिक सत्रात डॉ. हेमंत बोरकर (IIT, इंदोर), आभासी पद्धतीने डॉ. सानिया ए. सी. करबीनेरिओ (पोर्तुगाल) तसेच जयदीप भट्टाचार्य (गोवा) यांनी तज्ज्ञ मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. संतोष कुमार वर्मा (चीन) व डॉ. पोनुदुराई रामासामी (मॉरिशस) यांनी आभासी पद्धतीने मार्गदर्शन केले. दोन दिवसीय या परिषदेत एकूण सहा तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी देश-विदेशातील ४०० पेक्षा अधिक प्राध्यापक, तज्ज्ञ संशोधक, संशोधन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. विज्ञान शाखेतील विविध उपविषयांवर तसेच पीएच.डी. संशोधनासह १०० हून अधिक शोधनिबंध व्यक्तिशः व आभासी पद्धतीने सादर करण्यात आले. दि. ३ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या समारोप कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. सुभाष कोंडावार, प्र-कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटन सत्राचे संचालन डॉ. भाग्यश्री गवते व प्रा. अपर्णा दुर्गे यांनी केले. परिषद संयोजक डॉ. ज्योत्स्ना खोब्रागडे यांनी प्रास्ताविक केले. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर बहिरवार होते. आभार प्रदर्शन डॉ. योगिता बोडखे यांनी केले. उद्घाटनाच्या दिवशी सायंकाळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. समारोप सत्राचे संचालन डॉ. मनीषा जीवतोडे व प्रा. प्रदीप मांडवकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. वासुदेव गुरनुले यांनी केले. समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भास्कर बहिरवार होते, तर आभार प्रदर्शन परिषद संयोजक डॉ. ज्योत्स्ना खोब्रागडे यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या