चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस विभागातर्फे २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ऑपरेशन शोध मोहिम–१४ (In Chandrapur district, the police department will conduct Operation Search Campaign-14 from January 20 to February 20, 2026.)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस विभागातर्फे २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ऑपरेशन शोध मोहिम–१४ (In Chandrapur district, the police department will conduct Operation Search Campaign-14 from January 20 to February 20, 2026.)

चंद्रपूर :- बेपत्ता व घरातून निघून गेलेल्या हरविलेल्या मुले-मुली, युवक-युवती तसेच वयोवृद्ध इसमांच्या शोधासाठी चंद्रपूर जिल्ह्यात २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ऑपरेशन शोध मोहिम–१४ राबविण्यात येत आहे. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार राज्यभर ही विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून, हरविलेल्या बालकांचा तसेच इतर हरविलेल्या व्यक्तींचा शोध अधिक प्रभावीपणे घेण्यावर भर देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्हा पोलीस दल सक्रियपणे विविध ठिकाणी शोधकार्य करीत आहे. या मोहिमेत नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याने, सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या परिसरात, रेल्वे स्थानके, बस स्थानके, रस्त्यावर भीक मागणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, तसेच धार्मिक स्थळे, रुग्णालये, हॉटेल्स, दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणारी मुले घरातून निघून आलेली असल्याची माहिती असल्यास किंवा कोणत्याही हरविलेल्या इसमांबाबत काहीही माहिती मिळाल्यास, तात्काळ कळवावे. नागरिकांनी अशी माहिती चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या व्हॉट्सॲप क्रमांक ७८८७८९०१०० किंवा आपत्कालीन क्रमांक ११२ वर देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे अनेक हरविलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)