३ रे राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलन २० व २१ डिसेंबर चंद्रपूरात, विविध कार्यक्रमाच आयोजन (The 3rd National Jaybhim Literary Conference will be held in Chandrapur on December 20th and 21st, with various programs organized.)
चंद्रपूर :- मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून लोकजागृती नाट्य कला, क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक संस्था, चंद्रपूर द्वारा आयोजित दोन दिवसीय ३ रे राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलन, चंद्रपूर- २०२५ २० डिसेंवर २०२५ आणि रविवार दि. २१ डिसेंबर रोजी चंद्रपूरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्य सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. ग्रंथदिंडी दुपारी ४.०० वा. या बस स्टॅन्ड चंद्रपूर ते प्रियदर्शनी नाट्य सभागृह पर्यंत ग्रहभाग- लोककलावंत, विद्यार्थी, लेखक, साहित्यीक व नागरीक, उद्घाटन समारंभ शनिवार दि.२० डिसेंबर २०२५ ला सायंकाळी ५.३० वा. असून मा. लक्ष्मण गायकवाड, मा.श्याम तागडेमा. विनय गौड़ा, जिल्हाधिकारी चंद्रपूर, मा.प्रा.डॉ. प्रमोद मुनघाटे, मा. देवेंद्र गावंडे, मा.प्रा.डॉ. ईसादास भड़के, मा.प्रा. डॉ. प्रमोद काटकर, मा.प्रा. डॉ. राजेश दहेगावकर, मा. प्रदीप ढवळ, ई ची उपस्थिती राहणार आहे. तर शनिवार दि. २० डिसेंबर २०२५, सायं. ७.०० वा. कवी संमेलन या कवी संमेलनाला अध्यक्ष इ. मो. नारनवरे, युवराज गंगाराम, शालिक जिल्हेकर, हृदय चक्रधर, हेमंत वारसागडे, मनोहर गजभिये, खेमराज भोयर, रमेश बुरबुरे, रात्री ८.०० वा. मी रमाई बोलतेय' एकपात्री नाट्य प्रयोग प्रा.डॉ.संगीता टेकाडे, लेखक -संजय जिवणे, वेळ रात्री ८.३० वा. 'दलित साहित्य प्रवाहात कादंबरी का फुलली नाही' विषयावर परिसवाद प्रमुख अतिथी अशोक पवार, बिऱ्याडकार, प्रा. धनराज खानोरकर, डॉ. शुभांगी पाटील, प्रा. रवी कांबळे ई ची उपस्थिती राहणार आहे. रात्री ९.३० वा. 'जयभीम जलसा' अभिनेत्री कोमल धांडे, पार्श्व गायिका, मनोज राजा, ज्येष्ठ कवी व गायक, नेहा गाडे धम्मजित तिगोटे, गायक ई उपस्थित राहणार आहे.
रविवार दि. २१ डिसेंवर २०२५ सायं. ५.०० वा कथाकथन सादर होणार असून यात सहभाग मिनाक्षी वाळके, सिमा भसारकर, डॉ. शुभांगी पाटील, श्रृंखल भोयर ई असणार आहेत. तर सायं. ५.३० वा. कवी संमेलन पार पडणार असूनअध्यक्ष कवी खेमराज भोयर, नरेंद्र सोनारकर, सिमा भसारकर, दिलीप पाटील, मधू बावलकर, राजेश डेभारे, संगीता धोटे, अनधा मेश्राम, इरफान शेख, अभिजित ठमके तर सायं. ६.०० वा. मराठी गजल संमेलन यात अध्यक्ष म्हणून मंगेश जनबंधू, मिलिंद उमरे, भावीक सुखदेवे, जयंती वनकर, अंजुमन शेख, दिलीप पाटील ई चा सहभाग असणार आहे. तर सायं. ६.३० वा. 'समकालीन मराठी साहित्य आनि जात' या विषयावर परीसंवाद आयोजित असून अध्यक्ष प्रा.डॉ. ईसादास भडके, प्रा.डॉ. अनमोल शेडे, प्रा. डॉ. विद्याधर बनसोड, प्रा. डॉ. संजय लाटेलवार, प्रा. अविनाश पोर्डनकर, प्रा.डॉ. राजकुमार मुसने, या संमेलनाचा समारोप व सत्कार समारंभ रविवार दि. २१ डिसेंबर २०२५ ते सायं. ७.३० वा. होणार असून लक्ष्मण गायकवाड, मा.डॉ. अनिल हिंरेखन, मा. प्रमोद मुनघाटे, मा. सिद्धार्थ गायकवाड, मा.बापूसाहेब गजभारे, मा.लोकनाथ यशवंत, मा. प्रमोद काळबांडे, मा. ललित खोब्रागडे ई ची उपस्थिती लाभणार आहे. तर रात्री रात्री ८.३० वा. नाटक 'दि ग्रेट कार्यकर्ता' सादर होणार असून या नाटकाचे लेखक निर्माता व दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर असून या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन अनिरुद्ध वनकर यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या