दिल्ली येथे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणासोबत सकारात्मक बैठक...
चंद्रपूर :- चंद्रपूरच्या मूल रोडवरील वन अकादमी जवळील १७१ हेक्टर क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या टायगर सफारी प्रकल्पाला लवकरच केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळणार आहे. गुरुवारी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या सदस्य सचिवां सोबतच्या बैठकीत या प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच प्राधिकरणाची अधिकृत बैठक घेऊन मंजुरी देण्यात येईल, असे निश्चित झाले आहे. यामुळे चंद्रपूर टायगर सफारीच्या कामांना गती मिळणार आहे. आपण या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. याआधी राज्याचे वनमंत्री मा श्री गणेश नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा विषय मांडला होता. मंत्री महोदय यांनीही प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत निधी वितरण प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाची पाहणी करून प्रकल्पाच्या आराखड्याची माहिती घेतली होती. त्यानंतर आज दिल्ली येथील केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणातील अधिकाऱ्यांशी सकारात्मक बैठक झाली असून लवकरच या प्रकल्पाला मंजुरी मिळणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या