बल्लारपूर शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने श्रीमती इंदिरा गांधी आणि सरदार पटेलानां अभिवादन (On behalf of Ballarpur City Congress Committee, we salute Mrs. Indira Gandhi and Sardar Patel.)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने श्रीमती इंदिरा गांधी आणि सरदार पटेलानां अभिवादन (On behalf of Ballarpur City Congress Committee, we salute Mrs. Indira Gandhi and Sardar Patel.)

बल्लारपूर :- बल्लारपूर शहर काँग्रेस कमेटीने दि.३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी आयोजित एका कार्यक्रमात देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या ४१ व्या पुण्यतिथी आणि देशाचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. सर्व प्रथम उपस्थितानी इंदिरा गांधी आणि सरदार पटेल यांच्या छायाचित्रांना पुष्प अर्पण केले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव घनश्याम मूलचंदानी यांनी उपस्थितांना संबोधित करतानां म्हटले की, इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत.त्या चार वेळा देशा ची पंतप्रधान होत्या.तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९४७ ते १९५० पर्यंत भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून काम पाहिले.
            शहराध्यक्ष देवेंद्र आर्य आणि माजी शहराध्यक्ष अब्दुल करीम यांनी दोन्ही महान विभूतींच्या जीवनी वर प्रकाश टाकला. या प्रसंगी तालुका कांग्रेस अध्यक्ष गोविंदा उपरे, महिला तालुका अध्यक्ष अफसाना सय्यद, सेवादल संघटक प्राणेश अमराज, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक डॉ. अनिल वाढाई, माजी नगराध्यक्षा छाया मडावी, सुनंदा आत्राम, दिलीप माकोडे, डॉ. मधुकर बावणे, इस्माईल ढांकवाला, नरेश मुंधडा, दिपक धोपटे, पवन मेश्राम, नरेश आनंद, मुक्कदर सय्यद, फारूक खान, शिवबचन राजभर, महमूद पठाण, इंदू राजूरकर, अमकुबाई भुक्या, वर्षा दानव, आकाशकांत दुर्गे, मंगेश बावणे, प्रफुल्ल बोप्पनवार, लखपती घुगलोत , सुरेश बोप्पनवार, रोहित चुटे, सय्यद वकील, प्रीतम पाटील, निशिकांत खैरे, महेश सदाला, अस्लम शेख, कासिम शेख सह महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवा दल, एन एस यू आय, इंटकचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)