बल्लारपूर :- वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गांभीर्याने लढणार आहे. वंचितांना सत्तेत सहभागी करण्याचा संकल्प आहे. महायुती व महाविकास आघाडी बहुजनांचा केवळ मतांसाठी वापर करत आहे. आता आपण सत्ता संपादन करण्याची मानसिकता बाळगा.आगामी सत्ता केंद्र आपले असेल. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेत आपली सत्ता हवी आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ अध्यक्ष भगवान भोंडे यांनी गुरुवारी बल्लारपूर येथे केले.
बल्लारपूर शहर व तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बल्लारपूर येथे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने सत्ता संपादन कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. मेळाव्यात उदघाटक म्हणून भगवान भोंडे बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य कुशल मेश्राम, विवेक हाडके, प्रफुल्ल मानके, प्रशांत नगरकर, प्रकाश तावाडे, महिला आघाडी अध्यक्ष कविता गौरकार, सहसचिव अल्का मोटघरे, शुभम मंडपे, नम्रता साव, रेखा पागडे, बल्लारपूर शहर अध्यक्ष उमेश कडू आदींची उपस्थिती होती. दरम्यान वंचित बहुजन आघाडीत नव्याने प्रवेश घेणाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कुशल मेश्राम म्हणाले, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत एकसंघ राहून काम करावे. ही संधी गमावू नका. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक निर्धाराने लढली पाहिजे. तरच आपणांस सत्ता संपादन करता येईल, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक शहर अध्यक्ष उमेश कडू यांनी केले. मेळाव्याचे संचालन राकेश पेटकर यांनी, तर आभार रेखा पागडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रभूदास देवगडे, परमानंद भडके, शंकर वनकर, सुरत शृंगारे, प्रियंकेश शिंगाडे, जोशीला वाघाडे, शारदा कोसे, जया भंडारे, अल्का अलोने, वनमाला भसारकर, प्रज्ञा नमनकर, सुप्रिया चंदनखेडे, वत्सला तेलंग, अभिलाष चुनारकर, महेंद्र निवलकर, मोनू खोब्रागडे, गौतम रामटेके आदींनी सहकार्य केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या