सन २०२५-२६ मधील “विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” अंतर्गत या महोत्सवाचे आयोजन (This festival is organized under the “Developed India Challenge Track” in the year 2025-26.)

Vidyanshnewslive
By -
0
सन २०२५-२६ मधील “विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” अंतर्गत या महोत्सवाचे आयोजन (This festival is organized under the “Developed India Challenge Track” in the year 2025-26.)

वृत्तसेवा :- युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षी आयोजित केला जाणारा जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५ यावर्षी २७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांनी आपली नोंदणी ४ नोव्हेंबरपर्यंत https://forms.gle/Kmof5utKSuEqL3Pb9 या गुगल फॉर्मद्वारे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या “विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” अंतर्गत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सन २०२५-२६ मधील राष्ट्रीय युवा महोत्सव (Viksit Bharat Challenge Track) चे राष्ट्रीय आयोजन १० ते १२ जानेवारी २०२६ या दरम्यान होणार असून त्यासाठीची जिल्हास्तरीय निवड म्हणून या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत वक्तृत्व,कथा लेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कविता लेखन, नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत १५ ते २९ वर्षे वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. स्पर्धांबाबतची सविस्तर माहिती www.dsomumbaicity.blogspot.com या ब्लॉगवर उपलब्ध आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)