बुद्धगिरी मुल येथे भिक्खू संघाद्वारे संतोष सिंह रावत यांचा सत्कार, बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारास भिक्खू संघाचे मोलाचे योगदान :- संतोष सिंह रावत (Santosh Singh Rawat felicitated by the Bhikkhu Sangh at Buddhagiri Mul, valuable contribution of the Bhikkhu Sangh to the propagation of Buddhism: - Santosh Singh Rawat)

Vidyanshnewslive
By -
0
बुद्धगिरी मुल येथे भिक्खू संघाद्वारे संतोष सिंह रावत यांचा सत्कार, बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारास भिक्खू संघाचे मोलाचे योगदान :- संतोष सिंह रावत (Santosh Singh Rawat felicitated by the Bhikkhu Sangh at Buddhagiri Mul, valuable contribution of the Bhikkhu Sangh to the propagation of Buddhism: - Santosh Singh Rawat)


मुल :- वर्षावास समाप्ती संघदान कठीण चिवरदान महोत्सव भदंत संघवस थेरो यांच्या १९ व्या वर्षावास समाप्तीच्या निमित्ताने बुद्धगिरी मुल येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला श्रद्धेय भदंत सुमनवंनो महाथेरो महासचिव महाराष्ट्र प्रदेश भिक्खू संघ, श्रद्धेय भदंत संघवंस थेरो बुद्धगिरी टेकडी मुल, भदंत आनंद थेरो बल्लारपूर, भिक्खू धम्मप्रकाश संबोधी चंद्रपूर, भिक्खू सुजात नागपूर, यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष सिंह रावत यांचा सत्कार करण्यात आला. भिक्खू संघाला आजपर्यंतच्या दिलेल्या धम्मदानाचे तसेच बुद्धगिरी टेकडी मुल येथे भदंत संघवंस थेरो यांच्या निवासाकरिता एक सुंदर अशी कुटी उपलब्ध करून दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भिक्खू संघाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराच्या कार्यक्रमादरम्यान संतोष सिंह रावत यांनी भिक्खू संघाला समाजाने दान देऊन भंतेजी यांना बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याकरिता मदत केली पाहिजे असे उपस्थितांसमोर नम्र आवाहन केले. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भिक्खू संघ टिकला तर बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होईल. तथागत गौतम बुद्धांनी जगाला संदेश दिला तो या सृष्टीच्या कल्याणाकरिता निश्चितच उपयोगी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. भदंत संघवस थेरो यांनी संतोष सिंह रावत यांचे कार्य भिक्खू संघासाठी मोलाचे असून प्रेरणादायी आहे त्यांचे धम्मदानाचे कार्य अविरत सुरू राहावे अशी मनोकामना केली. सदर कार्यक्रमात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरु गुरुनुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, काँग्रेस शहर अध्यक्ष सुनील शेरकी, संजय पडोळे,युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे, पवन नीलमवार, सुरेश फुलझले, ललिता ताई फुलझले, डेव्हिड खोब्रागडे, सुजित खोब्रागडे, आकाश दहिवले, संदीप मोहबे, सौरभ वाढई तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)