बल्लारपूर : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता कबड्डी (महिला) संघाची निवड करण्यात आली असून, यात शहरातील महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयाची बीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी तृप्ती विनोद झुंगरे हिची निवड झाली आहे. सदर संघ पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धा खेळणार असून रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे २७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ही स्पर्धा आयोजित केली आहे. निवडपात्र संघ २६ ऑक्टोबर रोजी नांदेडकडे प्रयाण करणार आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या कबड्डी (महिला) संघात आरती बारसागडे (एस. पी. कॉलेज, शुक्ला चंद्रपूर), पलक (बीएससीएस फिजिकल एज्यु. कॉलेज, तळोधी), समीक्षा मडावी (चिंतामणी सायन्स कॉलेज, पोंभुर्णा), वैष्णवी मेश्राम (शिवाजी कॉलेज, गडचिरोली), मयुरी काळे (कर्मवीर कॉलेज, मूल), राजानी बालकिसन (बी.एस.सी. एस. कॉलेज, तळोधी), राधिका वाटेकर (आर. एस. कॉलेज, विसापूर), शालिनी निर्मळकर (एस. पी. कॉलेज, चंद्रपूर), निशा चिट्टे (एफ. ई. जी. गर्ल्स कॉलेज, चंद्रपूर), जयश्री उनीवर (शिवाजी कॉलेज, गडचिरोली), वेनेला पेंदाम (एस. बी. कॉलेज, अहेरी), आरती हनुमंते (गुरुनानक सायन्स कॉलेज, बल्लारपूर), ध्यानेश्वरी गोंडाटे (के. के. कॉलेज, वैरागड), साक्षी वासेकर (एन. एस. कॉलेज, भद्रावती), तृप्ती विनोद झुंगरे (एम. जे. एफ. कॉलेज, बल्लारपूर) यांची निवड केली आहे. तृप्ती झुंगरे हिच्या निवडीबद्दल महाराष्ट्र शिक्षण प्रशासक मंडळाचे अध्यक्ष संजय कायरकर, प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या