बल्लारपूर शहरात अल्पवयीन मुलीसमोर गैरवर्तन करणाऱ्या तरुणाविरुद्ध POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल (A case under the POCSO Act has been registered against a youth for misbehaving in front of a minor girl in Ballarpur city.)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील एका वार्डात १८ वर्षीय तरुणाने शेजारी राहणाऱ्या लहान मुलीसमोर अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केले आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्या आपल्या पती आणि दोन मुलांसह शहरातील एका वार्डात राहतात. त्यांची ५ वर्षीय लहान मुलगी शिक्षण घेत आहे. सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असल्याने परिसरातील मुले घरासमोर खेळत असतात.
याचदरम्यान, शेजारी राहणारा आरोपी आझाद अशोक रोहीदास (१८) हा तरुण २१ ऑक्टोबर रोजी दुपारचा सुमारास आणि पुन्हा २३ ऑक्टोबर या दोन्ही दिवशी दुपारी १२ वाजताच्या सुमारास या चिमुकलीला इशारे करून जवळ बोलावत होता. ती गेली नाही, म्हणून त्याने आपली पॅन्ट खाली करून अश्लील प्रकार करत गैरवर्तन केले. या संतापजनक घटनेची माहिती समजताच मुलीच्या आईने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीसमोर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध ७५(२), ७९ बीएनएस तसेच १२ बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदा (POCSO Act) अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी आझाद अशोक रोहिदास याला अटक केले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या