आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक प्रा. कोमल खोब्रागडे यांचे हृदयविकाराने निधन (Senior thinker and writer of the Ambedkar movement, Prof. Komal Khobragade, passes away due to heart disease)
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते, विचारवंत, साहित्यिक आणि समाजप्रबोधनकार प्रा. कोमल खोब्रागडे यांचे मध्यरात्री बारा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ, रिपब्लिकन विचारधारा आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. चंद्रपूर शहरात आणि परिसरात त्यांच्या निधनाची बातमी कळताच शोककळा पसरली असून, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. प्रा. खोब्रागडे यांनी आयुष्यभर आंबेडकरी चळवळीच्या तत्त्वांचा प्रचार–प्रसार करत समाजातील वंचित घटकांना न्याय, समता आणि बंधुत्वाच्या विचारांची दिशा दिली. ते प्रगल्भ वक्ते, साहित्यिक आणि निष्ठावंत आंबेडकरी योद्धा म्हणून ओळखले जात होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या