सार्वजनिक बांधकाम विभाग बल्लारपूरमध्ये इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार पटेल जयंती उत्साहात साजरी (Public Works Department celebrates Indira Gandhi's death anniversary and Sardar Patel's birth anniversary with enthusiasm in Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0
सार्वजनिक बांधकाम विभाग बल्लारपूरमध्ये इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार पटेल जयंती उत्साहात साजरी (Public Works Department celebrates Indira Gandhi's death anniversary and Sardar Patel's birth anniversary with enthusiasm in Ballarpur)

बल्लारपूर :- देशाच्या इतिहासातील दोन थोर व्यक्तिमत्त्वांचे स्मरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, बल्लारपूर येथे माजी प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी तसेच देशाच्या एकतेचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात सरदार पटेल यांच्या राष्ट्रीय एकता व अखंडतेचा संदेश यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच इंदिरा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शीतल पोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन हर्षल दासरवार यांनी केले. या प्रसंगी उपविभागीय अभियंता संजोग मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करून दोन्ही महान नेत्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाचे अभियंता वैभव जोशी, अभियंता पवन सावरकर, अभियंता अनिल आंबटकर, अभियंता लीनता खोरगडे, हनीफ कुरेशी, अरविंद कुचनकर, शीतल पोडे, चित्रा, माधवी मेश्राम, हर्षल दासरवार, हरिदास डंबारे, बावणे, गिरडकर, सौदागर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)