बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे आज 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी विभागाच्या) वतीने भारताचे माजी गृहमंत्री वं लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त तसेच भारताच्या माजी प्रधानमंत्री राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिना निमित्ताने या दोन्ही महान विभूतीना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून वं दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी विचार मंचावर डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. पंकज कावरे, प्रा. ले. योगेश टेकाडे यांची उपस्थिती होती यावेळी विचार व्यक्त करतांना मान्यवरांनी या दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा गुण गौरव केला. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. बालमुकुंद कायरकर सर म्हणालेत की, सरदार पटेल यांनी लहान लहान राज्य एकत्रिकरण करून भारताला एकसंघ राष्ट्र निर्माण करण्यास मोठी मदत केली तसेच देशाचा राज्यकारभार एक महिला किती सक्षम पणे सांभाळू शकते हे इंदिरा गांधी यांच्या कार्य कर्तृत्वाने स्पष्ट होते. यावेळी एनसीसीच्या 21 महाराष्ट्र बटालियन युनिट वर्धा चे कॅडेट महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या