समाज माध्यमावर भावी नगरसेवकांचा चा उत्सव, संभाव्य नगराध्यक्षाच्या फलकांनी गजबजले बल्लारपूर शहर (Celebration of future corporators on social media, Ballarpur city bustling with placards of potential mayor)
बल्लारपूर :- नगर परिषदेचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर होताच बल्लारपूर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सोशल मीडियावर भावी नगरसेवक आणि भावी नगराध्यक्ष अशा शुभेच्छा संदेशांचा अक्षरशः पाऊस पडत असून, फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवरील पानं राजकीय पोस्टनी गजबजून गेली तर आहेत. याशिवाय संभाव्य नगराध्यक्षाच्या फलकांनी बल्लारपूर शहर गजबजले असल्याचे दिसून येत आहे बल्लारपूरचे नगराध्यक्ष पद ओबीसी प्रवर्गाच्या (महिला) साठी राखीव असून विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून फलकबाजी करण्यात येत आहे. आरक्षण निश्चित होताच संभाव्य उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. अनेक इच्छुकांनी आपल्या समर्थकांची भेट घेणे, मतदारांशी संवाद साधणे आणि प्रचारयोजना आखण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर मी येतोय आपल्या सेवेसाठी, विकासासाठी कटिबद्ध, भावी नगरसेवक अमुक प्रभागातून अशा घोषवाक्यांनी वातावरण रंगतदार बनले आहे. नगर परिषदेच्या आरक्षणानंतर आता स्थानिक पातळीवर राजकीय चर्चांना उधाण आले असून, येत्या काही दिवसांत संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्ष आणि गटांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केल्याचे चित्र सध्या बल्लारपूरात दिसत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या