स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, अंमली पदार्थ विरोधात कारवाई करत तब्बल ५२८ ग्रॅम एम.डी (MEPHEDRONE) ड्रग्ज पावडरसह ३५ लाख ७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त (Local Crime Branch action, action against narcotics, seizure of 528 grams of MD (MEPHEDRONE) drug powder along with valuables worth Rs 35 lakh 7 thousand 480)
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, वसीम इमदाद खान (वय ३७) , रा. वैगनवाडी रिक्षा स्टँडजवळ, साईबाबा मंदिर, गोंवडी, मुंबई हा एम.डी (MEPHEDRONE) ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन कार क्रमांक एम एच १० ई क्यू ०४२१ ने चंद्रपूरकडे येत होता. त्यावर पोलिसांनी साखरवाही फाट्याजवळ सापळा रचून आरोपीस वाहनासह ताब्यात घेतले. चंद्रपूर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी धडक कारवाई करत तब्बल ५२८ ग्रॅम एम.डी (MEPHEDRONE) ड्रग्ज पावडर आणि एकूण ३५ लाख ७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी साखरवाही फाटा, एच.पी. पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई केली.
सन २०२५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात एनडीपीएस कायद्यान्वये एकूण १५७ गुन्हे नोंदवून १९२ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून आरोपींकडून एकूण ८० लाख ५९ हजार ७७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापैकी गांजा विक्री प्रकरणे : २६ गुन्हे नोंदवून ५५.२४ किलो गांजा जप्त, ४० आरोपी अटकेत, मुद्देमाल ६ लाख ६२ हजार १६४., एम.डी ड्रग्ज प्रकरणे : १४ गुन्हे नोंदवून ७२२.६१४ ग्रॅम एम.डी ड्रग्स जप्त, ३१ आरोपी अटकेत, मुद्देमाल ४३ लाख ७८ हजार ०६०., ब्राउन शुगर प्रकरणे : १ गुन्हा नोंदवून २९८ ग्रॅम ब्राउन शुगर जप्त, २ आरोपी अटकेत, मुद्देमाल ३० लाख १९ हजार ५५०., अंमली पदार्थ सेवन करणारे : १५६ गुन्ह्यांत १८६ आरोपींवर कारवाई. चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने DRUG FREE CHANDRAPUR CAMPAIGN या उपक्रमांतर्गत नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. शाळा व महाविद्यालयांत Say No To Drugs, Yes To Life ही व्याख्याने, सायकल रॅली, ध्यानशिबिरे, पोस्टर व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. चंद्रपूर पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती असल्यास डायल ११२ किंवा मोबाईल क्रमांक ७८८७८९०१०० वर कळवावी. माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात येईल.
तपासादरम्यान आरोपीकडून एका प्लास्टिकच्या प्रेसलॉक पिशवीमध्ये एम.डी ड्रग्ज पावडर मिळून आली. सदर ड्रग्ज पावडरचे वजन ५२८ ग्रॅम असून त्याची बाजारभावानुसार किंमत २६ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. याशिवाय आरोपीकडून वापरलेला मोबाईल फोन, रोख रक्कम व कार असा एकूण ३५ लाख ७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या देखरेखीखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक काँक्रेडवार, बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सुनिल गौरकार, पोलीस हवालदार सुभाष गोहकार, इम्रान खान, सतिश अवघरे, रजनीकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, पोलीस शिपाई हिरलाल गुप्ता, शंशाक बदामवार, म.पो.हवा. विजयमाला वाघमारे, चालक पोहवा प्रमोद डंभारे, तसेच सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूरचे अधिकारी व कर्मचारी यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या