चंद्रपूर :- जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपूरी, मूल, घुग्घुस, गडचांदूर, चिमूर, राजुरा, नागभीड या नगर परिषदांमधील आणि भिसी नगर पंचायतीमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, महिला (अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिलांसह) यांचे आरक्षण सोडत पध्दतीने निश्चित करायचे आहे. सदर आरक्षण सोडत 7 आणि 8 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात येणार असून त्यासाठी पिठासीन अधिका-यांची नेमणूक करण्यात आली आहे. असे आहे आरक्षण सोडतीचे वेळापत्रक बल्लारपूर नगर परिषदेची आरक्षण सोडत 7 ऑक्टो. रोजी दुपारी 3 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मूल, अजय चरडे), वरोरा न.प. आरक्षण सोडत 7 ऑक्टो. रोजी दुपारी 3 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वरोरा, संदीप भस्के), नागभीड 7 ऑक्टो. दुपारी 3 वाजता (पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ब्रम्हपूरी, पर्वणी पाटील), गडचांदूर 7 ऑक्टो. दुपारी 3 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजुरा, रविंद्र माने), चिमूर न.प. आरक्षण सोडत 7 ऑक्टो. दुपारी 3 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी चिमूर, किशोर घाटगे). तर मूल न.प. आरक्षण सोडत 8 ऑक्टो. दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मूल, अजय चरडे), भद्रावती 8 ऑक्टो. रोजी दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वरोरा, संदीप भस्के), ब्रम्हपुरी 8 ऑक्टो. दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी, पर्वणी पाटील), राजुरा 8 ऑक्टो दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजुरा, रविंद्र माने), भिसी नगर पंचायतीची आरक्षण सोडत 8 ऑक्टो दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी चिमूर, किशोर घाटगे) आणि घुग्घुस न.प. आरक्षण सोडत 8 ऑक्टो. दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी, लघिमा तिवारी) आरक्षण निश्चित करण्याच्या सोडतीच्या वेळी वरील नगर परिषद / पंचायतीच्या क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी केले आहे.
मतदार यादी अंतिम करण्याकरीता प्राधिकृत अधिका-यांची नेमणूक चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, मुल, घुग्घुस, गडचांदूर, चिमूर, राजुरा, नागभीड या नगरपरिषदांमधील व भिसी नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम 2025 जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने 8 ते 13 ऑक्टो. 2025 पर्यंत प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर नियमाप्रमाणे विचार करून प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम करावयाची आहे. बल्लारपूर न.प. (प्राधिकृत अधिकारी तहसीलदार बल्लारपूर), वरोरा न.प. (प्रा. अधि. तहसीलदार वरोरा), भद्रावती न.प. (तहसीलदार भद्रावती), ब्रम्हपुरी न.प. (तहसीलदार ब्रम्हपुरी), मूल न.प. (तहसीलदार मूल), घुग्घुस न.प. (तहसीलदार चंद्रपूर), चिमूर न.प. (तहसीलदार चिमूर), नागभीड न.प. (तहसीलदार नागभीड), राजुरा न.प. (तहसीलदार राजूरा), गडचांदूर न.प. (तहसीलदार कोरपना), भिसी न.पं. (अपर तहसीलदार भिसी). उपरोक्तप्रमाणे प्राधिकृत केलेल्या अधिका-यांनी प्रारूप मतदार यादीवर 8 ते 13 ऑक्टो 2025 पर्यंत प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर नियमाप्रमाणे विचार करून निर्णय घ्यावा व आवश्यक असल्यास योग्य त्या सुधारणा मतदार यादीत कराव्यात, असे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी कळविले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या