स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, अवघ्या सहा तासांत घरफोडी उघडकीस : दोन आरोपींकडून २.९० लाखांचे दागिने जप्त (Local Crime Branch action, house burglary uncovered in just six hours: Jewelry worth Rs 2.90 lakhs seized from two accused)
चंद्रपूर :- चंद्रपूर पोलिसांच्या दक्ष कारवाईत अवघ्या सहा तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून, दोन आरोपींकडून तब्बल २ लाख ९० हजार ३५० रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. ही यशस्वी कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केली. फिर्यादी मंगेश प्रमोद रामटेके (वय २७) , रा. घुटकाला वार्ड, चंद्रपूर यांनी तक्रारीत नमूद केले की, त्यांनी १९ ऑक्टोबरच्या संध्याकाळी घराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. २० ऑक्टोबर रोजी सकाळी परत आल्यानंतर घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शोध मोहीम सुरू केली. तपासादरम्यान गुप्त माहितीवरून मौजा गडचांदूर येथील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपी आरीफ कलंदर शेख (वय २८) व गौरव उर्फ गोलू प्रफुल बोझोकर (वय २०), दोन्ही रा. वॉर्ड क्र. ३, गडचांदूर यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून एकूण २ लाख ९० हजार ३५० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरी, घरफोडी व अवैध धंद्यांविरोधात चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. त्याच मोहिमेअंतर्गत २० ऑक्टोबर रोजी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७५७/२०२५ अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी चंद्रपूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पो.उप.नि. सुनील गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, इमरान खान, पो.अं. किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता आणि शशांक बदामवार यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या