स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज, जिल्हा निवड मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न (Congress ready for local body elections, important meeting of District Election Board concluded)
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने व्यापक पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची चर्चा तसेच महाविकास आघाडी व मित्रपक्षांसोबत युती करून निवडणुका लढविण्याबाबत सविस्तर चर्चेसाठी जिल्हा निवड मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीस विरोधी पक्षनेते व माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, चंद्रपूर विधानसभा प्रभारी मुजीब पठाण, चिमूर विधानसभा प्रभारी संजय दुबे, बल्लारपूर विधानसभा प्रभारी उमाकांत अग्निहोत्री, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रितेश तिवारी आदींसह जिल्हा व तालुकास्तरावरील काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत “जनतेशी नातं, विकासाशी बांधिलकी” या सूत्रावर काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकांचा ध्यास घेतल्याचे जिल्हा नेतृत्वाने स्पष्ट केले. संभाव्य उमेदवारांच्या निवडीसाठी विविध निकषांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्ष बळकट करण्याच्या रणनीतींवर, संघटनात्मक मजबुतीकरणावर तसेच स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचार आराखडा आखण्यावर भर देण्यात आला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या