चंद्रपूर :- नागपूर जाणाऱ्या वाहन व वाहतूकदारां साठी महत्त्वाची सूचना, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केल आहे यानुसार नागपूर जिल्ह्यातील जामठा परिसर ते मिहान प्रकल्प उड्डाणंपूल परिसरात बच्चू कडू प्रहार संघटनेचे नेते व शेतकरी बांधव या ठिकाणी आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणावर आंदोलनासाठी बसले असल्यामुळे बुटीबोरी जिल्हा नागपूर येथे खूप मोठा ट्राफिक जाम झाला आहे. विशेष म्हणजे मागील 25 तासापासून जाम असून विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गसाह अन्य 2 राज्य महामार्गावरही जाम असल्याची स्थिती आहे. त्यामुळे नागपूरकडे जाणे शक्य नाही, फक्त वर्धा पर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे नागपूर जाणाऱ्या नागरिकांनी वरोरा-आनंदवन चौक मार्गे चिमूर-भिसी उमरेड मार्गाने नागपूर जाता येईल. किंवा वरोरा-जाम-गिरड-उमरेड मार्गाने नागपूर जाता येईल करिता नागरिकांनी त्या मार्गाचा वापर करावा. अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर यांचे कडून देण्यात आली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या