स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना दिला जोमाने लढण्याचा संदेश - हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे बल्लारपुरात भव्य स्वागत (Harshvardhan Sapkal gave a message to the workers to fight vigorously for the local body elections. State President Harshvardhan Sapkal received a grand welcome in Ballarpur.)

Vidyanshnewslive
By -
0
स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना दिला जोमाने लढण्याचा संदेश - हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे बल्लारपुरात भव्य स्वागत (Harshvardhan Sapkal gave a message to the workers to fight vigorously for the local body elections. State President Harshvardhan Sapkal received a grand welcome in Ballarpur.)


बल्लारपूर :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बल्लारपूर शहरात प्रथम आगमनावेळी प्रदेश सचिव घनश्याम मुलचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या नेतृत्वाखाली कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत करून परिसर दुमदुमवून टाकला. गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी दौर्‍यावर असताना हर्षवर्धन सपकाळ हे परतीच्या प्रवासात सायंकाळी बल्लारपूराला थोडा वेळ थांबले. नगर परिषद चौकात स्थित रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना भेट दिली. यावेळी बल्लारपूर शहर व तालुक्यातील काँग्रेसच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या भेटीदरम्यान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे गांभीर्याने पाहण्याचे, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचे आणि आगामी निवडणुकांमध्ये जोमाने काम करण्याचे आवाहन केले. जनतेचा विश्वास आणि पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवा, असे मार्गदर्शन त्यांनी उपस्थितांना केले. 
           यावेळी बल्लारपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदा उपरे, माजी अध्यक्ष अब्दुल करीम, भास्कर माकोडे, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, दिलीप माकोडे, डॉ सुनील कुलदीवार, डॉ अनिल वाढई, इस्माईल ढाकवाला, चेतन गेडाम, प्राणेश अमराज, नरेश आनंद, पवन मेश्राम, वासुदेव येरगुडे, महमूद पठाण सह प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणांनी परिसर दुमदुमला आणि वातावरणात उत्साह संचारला. स्थानिक कार्यकर्त्यांनीही प्रदेशाध्यक्षांच्या या भेटीला ऐतिहासिक ठरवत, प्रदेशाध्यक्षांचा ऊर्जावान संदेश म्हणजे काँग्रेसला नवचैतन्य देणारा क्षण अशी भावना व्यक्त केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 942717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)