बल्लारपूर - १५ ऑक्टोबर २०२५ रोजी, के.जी.एन. पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बल्लारपूर येथे भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून झाली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनावरील भाषणे, निबंध आणि चिंतन सादर केले. विज्ञान आणि शिक्षणातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करून विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी कथा सांगितल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्य श्रीमती स्वाती वाघमारे यांनी भूषवले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की डॉ. कलाम यांचे जीवन प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणास्थान आहे - कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि दृढनिश्चयाने कोणतीही उंची गाठता येते. श्वेता डोन्नेवर, ऐनाज खालिक आणि प्रिया झोडे यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते. सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांना डॉ. कलामजींचे विचार आणि आदर्श आपल्या जीवनात अंगीकारण्याचा संदेश दिला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या