जिल्हा परिषद चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त १६ ऑक्टोबर रोजी संविधान गॅलरी उद्घाटन (Constitution Gallery inaugurated on 16th October on the occasion of Dhamma Chakra Anupravaran Day at Zilla Parishad Chandrapur)
चंद्रपूर :- जिल्हा परिषद चंद्रपूर समाज कल्याण विभागाच्या वतीने गुरुवार, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त संविधान गॅलरी उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. (भा.प्र.से.) असतील, तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद पुलकित सिंह (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर हे भूषवणार आहेत. कार्यक्रमास मुम्मका सुदर्शन (भा.पो.से.), जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर तसेच एम. रामानुजन (भा.प्र.से.), मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत, चंद्रपूर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुण्यांमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, प्रकल्प संचालक मंजिरी टकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुलकुमार गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) नूतन सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम) मीना साखुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, शिक्षाधिकारी (प्राथमिक) अश्विनी सोनवणे (केळकर), शिक्षाधिकारी (माध्यमिक) राजेश पातळे तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी भागवत तांबे यांचा समावेश आहे. धनंजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या