बल्लारपूर :- तहसील कार्यालयात दररोज विलंबाने कर्तव्यावर येणाऱ्या १३ कर्मचाऱ्यांना तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे बुधवारी (दि. १५) उघडकीस आले, संबंधित कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. तहसील कार्यालयात महसुली प्रकरणे, उत्पन्न, जात प्रमाणपत्र यांसह अनेक कामे होतात. तहसील कार्यालय हे प्रमुख शासकीय कार्यालय असल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी असते, तहसील कार्यालयाची वेळ सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:१५ अशी आहे. परंतु, आठवड्याचा पहिला दिवस सोमवार (दि. १३) तहसीलदार रेणुका कोकाटे यांना कार्यालयातील बरेच जण सकाळी १०:०० वाजता गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यांनी नायब तहसीलदार, महसूल अधिकारी, शिपाई व इतर कर्मचाऱ्यांना करणे दाखवा नोटीस बजावली, पूर्वसूचना न देता कार्यालयात विलंबाने दाखल झाल्याने त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात येणार आहे. तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेवर हजर राहावे, अशा सूचना तहसीलदार कोकाटे यांनी दिल्या आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या