चंद्रपूर: जिल्ह्यात मानव - वन्यजीव संघर्ष तीव्र, रविवारला 2 व्यक्तीवर वाघाचा हल्ला 1 मृत्यू, 1 बचावला (Chandrapur: Human-wildlife conflict intensifies in the district, 2 people attacked by tiger on Sunday, 1 died, 1 survived)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर - मूल मार्ग हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातून जातो. रविवारी सायंकाळी या रस्त्याच्या कडेला वाघ उभा होता. त्यामुळे सर्व प्रवासी आपापली वाहने थांबवून वाघाचे दर्शन घेत होते. अंधार असल्याने गाड्यांच्या लाईटच्या प्रकाशात हा वाघ स्पष्टपणे दिसत होता. त्यानंतर वाघ जंगलात जाण्यास निघाला आणि पलटून पुन्हा रस्त्यावर येऊन मोटारसायकलस्वाराच्या दिशेने हल्ला करण्यासाठी झेपावला. त्याच वेळी मोटारसायकलस्वाराने गाडी जोरात पळवली. त्यामुळे सुदैवाने अनर्थ टाळला आणि मोटारसायकलस्वार थोडक्यात बचावला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात मानव - वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. गोंडपिंपरी तालुक्यात रविवारी वाघाने एका शेतकऱ्याला ठार केल्यानंतर चंद्रपूर - मूल मार्गावर मुख्य रस्त्यावर वाघाने एका मोटारसायकल स्वारावर हल्ला केला. या हल्ल्यात सुदैवाने मोटारसायकलस्वार बचावला. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)