बल्लारपूर पोलिसांची कारवाई, घरातून लोखंडी तलवार जप्त (Ballarpur police action, iron sword seized from house, one arrested)
बल्लारपूर :- बल्लारपूर पोलिसांनी नवरात्र दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रोव्ही/जुगार, आर्म अक्ट अंतर्गत पेट्रोलिंग करत असताना दि. 30 सप्टेंबर रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकांना गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की, साईबाबा वार्डमध्ये राहणारा आरोपी मनिष रामप्रसाद वर्मा (वय ३८) लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आपल्या घरी विनापरवाना लोखंडी तलवार बाळगून आहे. तत्काळ पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता स्वयंपाक ओटयाच्या खाली ठेवलेली तलवार जप्त करण्यात आली. याप्रकरणी आरोपी विरुद्ध कलम ४, २५ आर्म अक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, सहायक पोलीस निरीक्षक शब्बीर पठाण, पोहवा सत्यवान कोटनाके, सुनिल कामटकर, पुरूषोत्तम चिकाटे, विकास जुमनाके, पोअं सचिन आलेवार, खंडेराव माने, मिलींद आत्राम, मपोअं शालिनी नैताम यांसह पोलीस स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने पार पाडली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या