स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 160 ग्रॅम एमडी ड्रग्ससह दोन अटकेत ” 16 लाखांचा मुद्देमाल जप्त” (Major operation by local crime branch, two arrested with 160 grams of MD drugs, "assets worth Rs. 16 lakh seized")

Vidyanshnewslive
By -
0
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 160 ग्रॅम एमडी ड्रग्ससह दोन अटकेत ” 16 लाखांचा मुद्देमाल जप्त” (Major operation by local crime branch, two arrested with 160 grams of MD drugs, "assets worth Rs. 16 lakh seized")

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, 2 व्यक्ती हे चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात मादक पदार्थाची तस्करी करीत असल्याची माहिती मिळताच सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेनी कारवाई करून दिपक कृष्णा वर्मा (वय २८, रा. संजयनगर, चंद्रपूर) व आशिष प्रकाश वाळके (वय ३०, रा. मित्रनगर, चंद्रपूर) हे पांढऱ्या रंगाच्या डिजायर कार (क्र. MH-49 AS-2704) मधून अंमली पदार्थ घेऊन येत आहेत. त्यानुसार, फॉरेस्ट अकादमी समोर स्थानिक गुन्हे शाखेने नाकाबंदी उभारली, नाकाबंदी दरम्यान संबंधित वाहन आल्यानंतर पोलिसांनी ते थांबवून तपास केला असता, वाहनातून एमडी (मेफोड्रॉन) ड्रग पावडर आढळली. यावरून दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन रामनगर पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई केली आहे. यात चंद्रपूर शहरातील वन (फॉरेस्ट) अकादमी, मुल रोड परिसरात नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या कारमधून तब्बल 160 ग्रॅम एमडी (मेफोड्रॉन) पावडर आणि एकूण 16,12,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दिपक कांक्रेडवार, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, रजनिकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, सतिश अवथरे, शशांक बदामवार, हिरालाल गुप्ता, अजित शेंडे, इम्रान खान, किशोर वाकाटे, या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी पार पाडली. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)